vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

आयटीआय बेलापूरमध्ये शिवराज्याभिषेक दिनानिमित्त-विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

आयटीआय बेलापूरमध्ये शिवराज्याभिषेक दिनानिमित्त-विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

                     नवी मुंबई, प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त ६ जून २०२५ रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), बेलापूर येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या अभिनव संकल्पनेतून साकारला जात आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून सकाळी १०.00 वाजता ऑनलाईन पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रभर एकाच वेळी होणार आहे. या कार्यक्रमाला बेलापूर विधानसभा आमदार श्रीमती मंदाताई म्हात्रे, आय.एम.सी. ऑफ आयटीआय बेलापूरचे अध्यक्ष निशांत खाडे, तसेच नवी मुंबई महापालिकेच्या माजी नगरसेविका श्रीमती सरोजताई पाटील या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचारांची पेरणी व्हावी, यासाठी “नागरिकत्व आणि शिष्टाचार” या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. हे व्याख्यान शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरीचे सेवानिवृत्त निदेशक दिनेश नागोबा आलेवाड हे घेणार असून, त्यांचा अनुभव विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.  विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वृक्षारोपण, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम विविध उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.

      “शिवराज्याभिषेक दिन हा केवळ ऐतिहासिक दिवस नसून विद्यार्थ्यांना स्वाभिमान, नेतृत्वगुण व सामाजिक जबाबदारी शिकवणारा दिवस आहे. या कार्यक्रमातून युवा पिढीला प्रेरणा मिळेल, नवी मुंबईतील नागरिक, माजी प्रशिक्षणार्थी, पालक, व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन दि.बा.पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,बेलापूरचे प्राचार्य स. ज. पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

0000000

संबंधित पोस्ट

जागतिक महिला दिन कार्यक्रम उत्साहात संपन्ननवीन सक्षम पिढी घडविण्याचे काम महिलांच्या हाती- खासदार डॉ.कल्याण काळे

धारावीतील एन शिवराज मैदानात 55 वा वृक्ष संवर्धन दिन स्वच्छता अभियान

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’अंतर्गत आदिवासी समाजाच्या गावात १७ प्रकारच्या योजना राबविणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,गोद्री फत्तेपूर येथे गोर बंजारा आणि लबाना कुंभ स्मृतीस्थळी विविध विकास कामांचे ई-भूमिपूजनक्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन स्मारकस्थळी महिलांसाठी कौशल्य विकास केंद्र उभारणार..

vishwatmaklokswamivarta

आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सर्वसमावेशक प्रशिक्षणाचे नियोजन प्राधान्याने करा – मंत्री प्रकाश आबिटकर

vishwatmaklokswamivarta

नगरपरिषदांच्या सदस्य व अध्यक्ष पदांसाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम-2025 जाहीर

vishwatmaklokswamivarta

आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून ५ हजार २०० विशेष बसेस सोडणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक