vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

कोकणात गणेशोत्सवाला जाणाऱ्यांसाठी विशेष गाड्या सोडण्याची मागणी,भाजप आमदार आशिष शेलार.

कोकणात गणेशोत्सवाला जाणाऱ्यांसाठी विशेष गाड्या सोडन्या ची मागणी… भाजप आमदार आशिष शेलार…

मुंबई प्रतिनिधी : कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना सोडण्यात आलेल्या 72 विशेष रेल्वे गाड्या फुल झाल्या असून रेल्वेने अजून अधिकच्या गाड्या सोडाव्यात अशी मागणी भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी केली. रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांची त्यांनी भेट घेतली आणि त्यांना या संबंधीचे निवेदन दिले. कोकणात गणेशोत्सवाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई, विरार या भागातून मोठ्या प्रमाणात चाकरमानी गावी जातात. त्यांच्यासाठी ही विनंती करण्यात आली आहे.

 

यावर्षी कोकण रेल्वेने 72 अतिरिक्त उत्सव विशेष गाड्या सोडण्याची घोषणा केली आणि बुकिंग सुरु होताच त्यांचे बुकिंग पूर्ण क्षमतेने होऊन बरेचजण अद्याप प्रतिक्षा यादीतच आहेत. दरवर्षीच्या तुलनेत या गाड्या कमी असून 2019 ला कोकण रेल्वेवर 210 फेऱ्या व रेल्वे गाड्यांना 647 अतिरिक्त डबेही जोडले होते. तर त्यावेळी तिकीटांसाठी ज्यादा बुकिंग साठी 11 टपाल खात्यात, 17 रेल्वे स्थानकात पीआरएस सिस्टम आणि 16 ठिकाणी टाऊन बुकिंग एजन्सी आदी सुविधा 2019 ला खास कोकणवासीयांना उपलब्ध करुन दिल्या होत्या, असं त्यांनी निवेदनात नमूद केलं आहे.

या वर्षी अशा अधिकच्या बुकिंग सुविधा व अजून काही गाड्या कोकणातील चाकरमान्यांना उपलब्ध करुन देण्याबाबत कोकण रेल्वेला निर्देश द्यावेत. सध्याच्या काळात कोकणवासीयांना गेल्या वर्षी गणेशोत्सव आपल्या कोकणातील आप्तेष्टांबरोबर साजरा करता आला नव्हता.

संबंधित पोस्ट

भौगोलिक परिस्थितीनुसार पारंपरिक कृषी पंप देण्याचा शासनाचा विचार- ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

नाशिक मध्ये खाजगी बसला भीषण आग, दुर्घटनेत 11 प्रवाशांचा मृत्यू; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून मदत जाहीर

जिल्हा नियोजन समिती बैठक लोकसंख्येची वाढ गृहित धरुन नियोजन करावे- पालकमंत्री संजय शिरसाट

vishwatmaklokswamivarta

कृषी क्षेत्रात ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार– कृषिमंत्री कोकाटे

vishwatmaklokswamivarta

जागतिक महिला दिनानिमित्त विविध कलागुणांचा उत्साही अविष्कार व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान..

vishwatmaklokswamivarta

विमानतळ परिसरात कलम 144 लागू

vishwatmaklokswamivarta