
लखनौमध्ये दोन दहशतवाद्यांच्या अटकेनंतर एटीएसच्या दोन पथकांनी तातडीने कानपूर येथे अनेक भागात छापा..
प्रतिनिधी,नवी दिल्ली – देशावरील कोरोनाचे संकट आता कमी होताना दिसत आहे, त्यातच दहशतवादी कारवायांनी पुन्हा डोके वर काढले आहे. मात्र, देशातील एटीएस आणि पोलीस दलाने कार्यतत्परतेनं दहशतवादी कारवायांचा कट उधळून लावला. एटीएसनेउत्तर प्रदेशमधील काकोरी येथे 2 संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. अल कायदा या दहशवादी संघटनेचे हे हस्तक असून सुसाईड बॉम्ब हल्ल्याचा त्यांचा डाव असल्याचे उघडकीस आलं आहे. यासंदर्भात यूपीचे एडीजी प्रशांत कुमार यांनी माहिती दिली.
दहशतवाद्यांने मोठ्या प्रमाणात स्फोटके आढळले असून प्रेशर कुकर बॉम्बही सापडले आहेत. या कारवाईनंतर देशातील बर्याच राज्यात पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांच्या कारवायांवर एकप्रकारचा सर्जिकल स्ट्राईक केला आहे. लखनौमधील दहशतवाद्यांच्या अटकेच्या बातमीनंतर देशभरात सुरक्षेबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरपासून देशाच्या उर्वरित भागात सर्चऑपरेशन केले जात आहे. या दरम्यान दहशतवाद्यांचे कनेक्शन बांग्लादेशशी दिसून येत आहे. दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालपर्यंत भारतीय सुरक्षा संस्था वेगाने या तपासात प्रगती करत आहेत.



