vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांचा विशेष सत्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार

महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांचा विशेष सत्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार

📍मुंबई प्रतिनिधी#कुलाबा विधानसभा मतदारसंघासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल कफ परेड फेडरेशनच्या वतीने महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांचा विशेष सत्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.

देशातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष म्हणून ॲड. राहुल नार्वेकर यांनी अल्पावधीतच आपल्या कार्यक्षमतेच्या जोरावर संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक लोकसभेच्या अध्यक्षांनीही ‘भारतामधील सर्वोत्तम स्पीकर्सपैकी एक’ असे केले आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी काढले.

कुलाबा मतदारसंघातील हे संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करणारे ठिकाण आहे. मुंबई शेअर बाजार, उच्च न्यायालय, मंत्रालय, विधानभवन, कॉटन एक्स्चेंज, बुलियन मार्केट, मेटल मार्केट, मुंबई विद्यापीठ, मरीन ड्राईव्ह अशा अनेक ऐतिहासिक व महत्त्वाच्या वास्तू येथे आहेत. कुलाबा भागात वास्तव्य करणारी लोकसंख्या सुमारे १३ लाख असून, दररोज सुमारे ४८ लाख लोक चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून या भागात ये-जा करतात. या परिसराला ‘स्टेट कॅपिटल रिजन’ म्हणून दर्जा मिळाण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

यावेळी आमदार रवींद्र चव्हाण, महाराष्ट्राचे महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, मुख्यमंत्री यांच्या प्रधान सचिव आश्विनी भिडे, मुंबई महानगर विकास प्राधिकरणचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

हिंद दी चादर” कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी जिल्हाभर व्यापक उपक्रम….

vishwatmaklokswamivarta

वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार’ व ‘महाआरोग्य सन्मान २०२६’ चे आज वितरणयशवंतराव चव्हाण केंद्र येथे लोकोपयोगी विविध उपक्रमांचा शुभारंभ

विठ्ठल नामाचा गजर… महाराष्ट्राच्या संतपरंपरेची रोमेनियामध्ये भक्तीमय झलक!”🚩

स्वच्छता ही सेवा’ या राष्ट्रीय उपक्रमांतर्गत दिव्यांग मुलांनी खेळला पर्यावरणपूरक टाळ्यांचा गरबा

vishwatmaklokswamivarta

स्वित्झर्लंडमधील ‘दावोस’मध्ये गोव्याच्या ‘दैवी कणां’ची भुरळ; विज्ञानाला न उलगडणारे कोडे जागतिक पटलावर

कोकणवासियांना मोठा दिलासा- गणेशोत्सवानिमित्त कोकण रेल्वे तिकीटासाठी ठाणे रेल्वे स्थानकातील आरक्षण केंद्रात दोन अतिरिक्त तिकीट खिडक्या    खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते उद्घाटन सावंतवाडी स्थानकावर 3 महत्त्वाच्या गाड्यांना थांबा मंजूर,प्रवासी संघटनेने मानले नरेश म्हस्के यांचे आभार