vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

विधानपरिषद नियम क्रमांक २६० अन्वये चर्चेवर उत्तर-छत्रपती संभाजीनगरच्या वैद्यकीय रुग्णालयासाठी ३४.२८ कोटींचा निधी; औषधांचा तुटवडा नाही· मंत्री माणिकराव कोकाटे यांची विधानपरिषदेत माहिती

विधानपरिषद नियम क्रमांक २६० अन्वये चर्चेवर उत्तर-छत्रपती संभाजीनगरच्या वैद्यकीय रुग्णालयासाठी ३४.२८ कोटींचा निधी; औषधांचा तुटवडा नाही· मंत्री माणिकराव कोकाटे यांची विधानपरिषदेत माहिती

मुंबई, प्रतिनिधी :- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर येथे औषधे व शस्त्रक्रिया साहित्य खरेदीसाठी वित्तीय वर्ष 2024-25 मध्ये एकूण ३४.२८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. औषधांचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून या रुग्णालयात सध्या औषधांचा कोणताही तुटवडा नाही, अशी माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाबाबत विधानपरिषदेत नियम क्रमांक 260 अन्वये सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर मंत्री कोकाटे बोलत होते.

मंत्री कोकाटे म्हणाले, यामध्ये राज्य अनुदानातून १८.२९ कोटी व जिल्हा नियोजन निधीतून १५.९९ कोटी रुपयांचा समावेश आहे. तसेच वित्तीय वर्ष 2025-26 साठी देखील १० कोटी रुपये व २.५५ कोटी रुपयांची पुरवणी मागणी प्रस्तावित आहे.

 तसेच महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळामार्फत वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे सुरक्षा अधिकारी व रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.

0000

संबंधित पोस्ट

चित्तोडा ग्रामपंचायत सरपंचांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत उपसरपंच-सदस्यांचा राजीनामा…

नवी मुंबईत प्रदूषणकारी 19 बांधकामे बंद – 42 बांधकामांना नोटीसा समीर ॲप व प्रदूषण नियंत्रक मंडळाच्या वेबसाईटवरुन हवा गुणवत्ता विषयक अधिकृत माहिती घेण्याचे आवाहन

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्याबाबत अत्यंत महत्त्वाची सूचना-नवी मुंबई  क्षेत्रातील आणि कामोठे व खारघर नोड मधील पाणी पुरवठा बंद राहील तसेच शुक्रवार दि. 07 मार्च 2025 रोजी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.

महाराष्ट्र राज्यात नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीत.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

मागासवर्गीय शासकीय वसतिगृहांना महापुरुषांची नावे देण्याचा सामाजिक न्याय विभागाचा निर्णय

२० जुलैला छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यापार परिषद मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सचा २८ वा वर्धापन दिन…