vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

पेण येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना उमेदवार निवड मेळाव्याचे आयोजन

पेण येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना उमेदवार निवड मेळाव्याचे आयोजन

रायगड( प्रतिनिधी:- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग व पेण एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि.22 जुलै, 2025 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 02.00 या वेळेत भाऊसाहेब नेणे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, पेण ता.पेण येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा व मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण योजना (Internship) उमेदवार निवड मेळावा आयोजित करण्यात आला असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मागदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीम.अ.मु.पवार यांनी केले आहे.
जिल्ह्यातील नामांकीत आस्थापनांकडील रिक्तपदांच्या/ॲप्रेंटिसशिपची भरतीसाठी रोजगार मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात एस.एस.सी./एच.एस.सी, आय.टी.आय., डिप्लोमा इंजिनियर, पदवी इंजिनियर, व इतर पदवी धारक नोकरी इच्छूक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. या विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पध्दीतीने अर्ज करता येईल. प्रथम https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरील Employment- Job Seeker (Find A Job)- Job Seeker Login याक्रमाने जाऊन आपल्याकडील युजर आयडी व पासवर्ड वापरुन आपली शैक्षणिक माहीती अद्ययावत करून त्यातील Pandit Dindayal Upadhyay Job Fair या ऑप्शनमधून आपला जिल्हा निवडून जिल्ह्याच्या नावावरील Vacancy Listing-I Agree व दिसणाऱ्या विविध पदाना आपल्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे ऑनलाईन अप्लाय करावे. व तसेच मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनामध्ये इंटर्शिपला अप्लाय करण्यासाठी https://cmykpy.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरील Intern Login ला क्लिककरुन आपल्याकडील युजर आयडी व पासवर्ड वापरुन आपली प्रोफाईल व शैक्षणिक माहीती अद्ययावत करुन Apply for Jobs ला क्लिककरुन आपला जिल्हा निवडून दिसणाऱ्या आस्थापनेच्या रिक्तपदांना Apply करावा.
रोजगार मेळाव्यातील रिक्त पदांची माहिती https://rojgar.mahaswayam.gov.in यासंकेतस्थळावर उपलब्ध आहे. संकेतस्थळावर ऑनलाईन अप्लाय करताना काही समस्या असल्यास या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02141-222029 वर संपर्क साधावा.
00000

संबंधित पोस्ट

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत411 कोटी 17 लाख रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी

vishwatmaklokswamivarta

वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲङ निलेश हेलोंडे पाटील यांची शेतकरी आत्महत्या कुटूंबास भेट

विमाशि संघाचे गुरुवारी धरणे आंदोलन-विविध मागण्यांसाठी अधिवेशनादरम्यान धरणे / निदर्शने आंदोलन…

vishwatmaklokswamivarta

खासगी आस्थापनांतील अंतर्गत तक्रार समितीचीनोंद करण्यासाठी ‘शी बॉक्स पोर्टल’..

ऑटोरिक्षा मिटर रिकॅलिब्रेशनसाठी १५ सप्टेंबर  पर्यंत मुदतवाढ

विविध कृषी पुरस्कार सन-2023 करिताशेतकरी, गट, संस्था, व्यक्तींनी प्रस्ताव सादर करावेत..