vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नमुंमपा पदभरती परीक्षेच्या चौथ्या दिवशी 13128 उमेदवारांनी दिली परीक्षा*4 दिवसात एकूण 68149 उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा दिली* 

*नमुंमपा पदभरती परीक्षेच्या चौथ्या दिवशी 13128 उमेदवारांनी दिली परीक्षा*4 दिवसात एकूण 68149 उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा दिली*

         नवी मुंबई प्रतिनिधी- ‘नवी मुंबई महानगरपालिका सरळसेवा भरती – 2025’ परीक्षेच्या आज चौथ्या दिवशी 12 जिल्हयांमधील 28 परीक्षा केंद्रांवर 13128 उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा दिली. 16 ते 19 जुलै या परीक्षेच्या 4 दिवसात एकूण 68149 उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा दिली. सर्व केंद्रांवरली परीक्षा प्रक्रिया व्यवस्थित रितीने पार पडली.     गट – क आणि गट – ड मधील 30 संवर्गातील 668 पदांकरिता 12 जिल्ह्यांमध्ये 28 केंद्रांवर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस (TCS) यांच्या माध्यमातून परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. या परीक्षा प्रक्रियेवर निरीक्षण व नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, नवी मुंबई महानगरपालिकेच्या वर्ग 1 श्रेणीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची ‘समन्वय अधिकारी ‘म्हणून तसेच 29 अधिकाऱ्यांची ‘केंद्र निरीक्षक’ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

   आज परीक्षेच्या चौथ्या दिवशी –      सकाळी 9 ते 11 वा. या पहिल्या सत्रात 4596 उमेदवारांनी परीक्षा दिली.      दुपारी 1 ते 3 वा. या दुसऱ्या सत्रात 4401 उमेदवारांनी परीक्षा दिली.      सायं. 5 ते 7 वा. या तिसऱ्या सत्रात 4131 उमेदवारांनी परीक्षा दिली.     अशाप्रकारे नमुंमपा सरळसेवा भरती प्रक्रियेच्या चौथ्या दिवशी 13128 उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा दिली आहे.     पदभरती परीक्षेच्या पहिल्या दिवशी 21515 उमेदवारांनी, दुस-या दिवशी 18442 उमेदवारांनी, तिस-या दिवशी 15064 उमेदवारांनी व चौथ्या दिवशी 13128 उमेदवारांनी परीक्षा दिली आहे. अशाप्रकारे चार दिवसात 68149 उमेदवारांनी 28 केंद्रांवर ऑनलाईन परीक्षा दिलेली आहे. चार दिवसांची ही संपूर्ण परीक्षा प्रक्रिया सुव्यवस्थित रितीने पार पडली आहे.      या संपूर्ण परीक्षा प्रक्रियेशी संबंधित सर्व घटकांचे तसेच 12 जिल्ह्यांतील पोलीस विभागाचे आणि उमेदवारांचे नवी मुंबई महानगरपालिकेकडून आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

     *नवी मुंबई महानगरपालिकेची भरती प्रक्रिया पारदर्शक व नियमानुसार काटेकोरपणे होत असून नोकरी मिळवून देण्यासाठी कोणत्याही प्रकारची मागणी केली जात असल्यास उमेदवारांनी दक्ष रहावे व स्थानिक पोलीसांकडे तक्रार करावी असे सूचित करण्यात येत आहे. भरतीविषयक कोणत्याही भूलथापांना व आमिषांना बळी न पडता तसेच याबाबत अफवांवर विश्वास न ठेवता परीक्षेच्या निकालाविषयी अधिकृत माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी महानगरपालिकेचे संकेतस्थळ www.nmmc.gov.in तसेच महानगरपालिकेच्या अधिकृत सोशल मिडीया पेजला भेट द्यावी असे आवाहन नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केले आहे

000000

संबंधित पोस्ट

कृषी सखींचे ५ दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रमास सुरुवात

मुंबईतील नेहरू नगर कुर्ला पूर्व येथे,अडाणी हटाव कुर्ला बचाव च्या काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचा मोर्चा

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

vishwatmaklokswamivarta

माहीम नवरंग कंपाऊंड येथे लागली भीषण आग…

vishwatmaklokswamivarta

भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनीही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जात त्यांनी भेट घेतली

vishwatmaklokswamivarta

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत कोल्हापूर चित्रनगरीत विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण.