vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

लातूर जिल्ह्यात रासायनिक खतांची विक्री ई-पॉस प्रणालीद्वारे करणे बंधनकारक

लातूर जिल्ह्यात रासायनिक खतांची विक्री ई-पॉस प्रणालीद्वारे करणे बंधनकारक

लातूर, प्रतिनिधी काय झाला जिल्ह्यातील सर्व किरकोळ रासायनिक खत विक्रेत्यांना अनुदानित रासायनिक खतांची विक्री ई-पॉस प्रणालीद्वारे करणे बंधनकारक आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवसांब लाडके यांनी कळविले आहे.

खत विक्रीच्या नोंदी तात्काळ आणि अचूकपणे आयएफएमएस प्रणालीमध्ये नोंदविणे आवश्यक आहे. ई-पॉस प्रणालीवरील खत साठा आणि प्रत्यक्ष गोडाऊनमधील साठा यामध्ये कोणतीही तफावत आढळू नये. यासाठी विक्रीची नोंद रियल टाइममध्ये घेणे बंधनकारक असून, याबाबत क्षेत्रीय खत निरीक्षकांमार्फत नियमित तपासणी केली जाणार आहे. साठ्यात तफावत आढळल्यास संबंधित अहवाल तात्काळ लातूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय येथे पाठवावेत. तसेच, ज्या विक्रेत्यांनी अद्याप नवीन एल-1 सिक्युरिटी ई-पॉस मशिन प्राप्त केले नाही, त्यांनी 10 ऑगस्ट 2025 पूर्वी कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, लातूर यांच्याशी संपर्क साधून मशिन प्राप्त करावे आणि कार्यान्वित करावे, असे आवाहन श्री. लाडके यांनी केले आहे.

****

संबंधित पोस्ट

भाजपा जालना शहराच्या वतीने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन, वृक्षारोपण व जिल्हा कार्यकर्ता संमेलनाचे आयोजनमोठ्या संख्येने उपस्थित राहावे – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

अकोल्यात हिंदुत्वाचा महाहुंकार: ‘भारताला अधिकृतपणे हिंदु राष्ट्र घोषित करा’– आमदार टी. राजा सिंह यांचे प्रतिपादन१६ हजारांहून अधिक हिंदूंच्या उपस्थितीत अकोल्याचे ‘एकवीरा मैदान’ चैतन्यमय;संतांच्या वंदनीय उपस्थितीत पार पडली भव्य ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ सभा..

vishwatmaklokswamivarta

किल्ले प्रतापगडाच्या संवर्धन कामाला गती द्यावी* – *पालकमंत्री शंभूराज देसाई* 

शेती ही केवळ अन्न देणारी व्यवस्था नसून, ती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे -उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात पहिल्या आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकॅथॉनचे उद्घाटन

जन विश्वास विधेयक, 2026′ संसदेत मंजूर झाल्याबद्दल केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केले समाधान

एसटीच्या टप्पा वाहतूक सेवेची १४.९५ टक्के भाडेवाढ करण्यास मान्यता २५ जानेवारी मध्यरात्रीपासून भाडेवाढ लागू

vishwatmaklokswamivarta