vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा परिषदेत पाणी पुरवठ्यासाठी नवीन चार दुरुस्ती पथकांची खरेदी

जिल्हा परिषदेत पाणी पुरवठ्यासाठी नवीन चार दुरुस्ती पथकांची खरेदी

अमरावती, प्रतिनिधी: जिल्ह्यातील ग्रामीण जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सध्या कार्यरत असलेल्या 6 हजार 25 हातपंपांच्या नियमित देखभाल व दुरुस्तीसाठी आता चार नवीन दुरुस्ती वाहने खरेदी करण्यात आली आहेत. यामुळे, हातपंपांची देखभाल व दुरुस्ती अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सन 2023-24 च्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतून पथकांच्या खरेदीसाठी रुपये 49.96 लाख इतका निधी उपलब्ध करून दिला. या निधीतून सन 2025-26 या वर्षात ही चार नवीन दुरुस्ती पथके खरेदी करण्यात आली आहेत. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी हेमंत ठाकरे, तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनिल जाधव आणि उप अभियंता प्रमोद कराळे यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

00000

संबंधित पोस्ट

स्वातंत्र्य दिन सोहळ्याचा भाग म्हणून, भारतीय नौदलाचा बँड मुंबईतील विविध महत्त्वाच्या ठिकाणी सादरीकरण करणार

निवडणूक प्रचारावरील निर्बंधात बदल-मतदानाच्या आधीच्या दिवशी रात्री १० पासून प्रचारबंदी लागू

vishwatmaklokswamivarta

मॉडेल करिअर सेंटरच्या माध्यमातून रोजगार निर्मिती- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

vishwatmaklokswamivarta

जलसंपदा विभाग-रायगडमधील शिलार प्रकल्पासाठी ४ हजार ८६९ कोटी…

मुंबई महानगरातील नालेसफाई ७ जूनपर्यंत पूर्ण करावी; नालेसफाईच्या कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्र्यांकडून नालेसफाईच्या कामाची पाहणी

दिव्यांगांप्रती सन्मान आवश्यक आहे. दिव्यांगासाठी आता स्वतंत्र विभागाची स्थापना झाली असल्याने त्यांना मिळणाऱ्या विविध योजनांचा लाभ सुलभ होण्यास मदत झाली असून जिल्हा प्रशासन दिव्यांगांना सक्षम बनविण्यासाठी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी केले.

vishwatmaklokswamivarta