vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मॉडेल करिअर सेंटरच्या माध्यमातून रोजगार निर्मिती- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

मॉडेल करिअर सेंटरच्या माध्यमातून रोजगार निर्मिती- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

            मुंबई, प्रतिनिधी : व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या समन्वयातून पालघर आयटीआयमध्ये मॉडेल करिअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या करिअर सेंटरमध्ये तरुणांना सीआयआय (कान्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री) प्रशिक्षण देत आहे. नुकतेच 27 तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आगामी काळात या सेंटरच्या माध्यमातून अधिकाधिक रोजगार मिळतील, असा विश्वास कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला.

  मंत्रालयातून दूरदृश्यप्रणालीव्दारे पालघर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील मॉडेल करिअर सेंटर मार्फत 27 युवकांना एसी टेक्निशीयन म्हणून नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात मंत्री श्री. लोढा बोलत होते. अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा, व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी, सीआयआय या संस्थेचे भारताचे जनरल मॅनेंजर सौरभ मिश्रा, मुंबईचे विनायक उक्के, पालघर आयटीआयचे प्राचार्य महेशकुमार सिदम, एकलव्य व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाचे प्रशिक्षक उमाकांत लोखंडे, एकलव्य आयटीआयचे रघुनाथ धुमाळ यासह पालघर आयटीआयचे अधिकारी उपस्थित होते.     मंत्री श्री.लोढा म्हणाले की, कौशल्य विकास विभाग काळानुरूप रोजगाराचे बदलते स्वरूप लक्षात घेवून प्रशिक्षण उपलब्ध करुन देत आहे. सीआयआय (कान्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री) या संस्थेच्या सहकार्याने पालघर व या परिसरात आयटीआय सोबत दहावी, बारावी व पदव्युत्तर युवकांना प्रशिक्षण देण्यात आले असून आगामी एक वर्षात दोन हजार पेक्षा अधिक युवकांना प्रशिक्षण देऊन अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.*****

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेत एक महत्त्वाचा तांत्रिक बदल करण्याचा निर्णय-महानगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांचा गोंधळ टाळण्यासाठी…

vishwatmaklokswamivarta

समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी समाजाचे संघटीत राहणे गरजेचे – शंकर बाईत,पती नसलेल्या स्त्रीयांना धार्मिक कार्यक्रमात सन्मानपूर्वक वागणूक देण्याचे आवाहन..

vishwatmaklokswamivarta

सार्वजनिक उत्सवांमध्ये स्वच्छता, आणि अन्न सुरक्षा यास विशेष लक्ष द्यावे – अन्नऔषध प्रशासन विभागाचे आवाहन

जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने अंतिम मतदार यादी सुधारित कार्यक्रम जाहीर-विक्रांत चव्हाण-उपजिल्हाधिकारी (महसूल)

vishwatmaklokswamivarta

ड्रोन उड्डाणास प्रतिबंध

vishwatmaklokswamivarta

विजयी भव, दिव्या..!’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विश्वचषक बुध्दीबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी दिव्या देशमुखला शुभेच्छा!