vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राज्यात जोरदार पावसानंतर: रायगड, कोकणमध्ये मदतीसाठी नौदलाची पथके दाखल…

राज्यात जोरदार पावसानंतर: रायगड, कोकणमध्ये मदतीसाठी नौदलाची पथके दाखल…

 

प्रतिनिधी,

मुंबई: नौदलाच्या नौसैनिकांची सुसज्ज पथके व निष्णात डायव्हर कोकण आणि रायगड परिसरात पोहोचले असून पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी नेण्यासाठी मोठी हेलिकॉप्टरही रवाना झाली आहेत. गरज भासल्यास राज्यात अन्यत्र पूरग्रस्त ठिकाणी जाण्यासाठीही नौदलाची पथके तयार ठेवण्यात आली आहेत. राज्य सरकारच्या विनंतीनुसार, नौदलाच्या पश्चिम विभागाने बचाव पथके तसेच हेलिकॉप्टर पूरग्रस्त भागात तैनात करण्याचा निर्णय घेतला. काल रात्री मुंबईहून निघालेली ही पथके आज सकाळी महाडपर्यंत गेली आहेत. पूर व पावसाच्या परिस्थितीनुसार तेथून ते पुढे जाणार आहेत.

खराब हवामानाची पर्वा न करता नौदलाची सात पथके रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात जाण्यासाठी काल रात्री मुंबईहून ट्रकमधून निघाली. तर मुंबईतील नौदलाच्या आएनएस शिक्रा या हवाई तळावरून सीकिंग हेलिकॉप्टर रायगड जिल्ह्यात जाऊन तेथील पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी नेईल. या पथकांकडे रबरी बोटी, प्रथमोपचार संच, लाईफ जॅकेट व अन्य जीवरक्षक साधने आहेत.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र राज्यात : हनुमान जयंतीनिमित्ताने सर्व राज्यांना अलर्ट राहण्याच्या केंद्राच्या सूचना…

vishwatmaklokswamivarta

मोठी बातमी: राजस्थानपासून मणिपूरपर्यंत जमीन हादरली; जयपूरमध्ये एका तासात तीन भूकंपाचे धक्के…

सकल गोर बंजारा समाज हैद्राबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला तात्काळ अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गामध्ये सामावून घ्यावे या मागणीसाठी आमरण उपोषण सुरु आहे..

vishwatmaklokswamivarta

कुतूहलातून विविध विषयांवरील साहित्याची निर्मिती; राज्यस्तरीय साहित्य संमेलनात डॉ. अच्युत गोडबोले यांचे प्रतिपादन मंत्री उदय सामंत यांनी दृकश्राव्य माध्यमाव्दारे संमेलनाला शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta

महसूल अधिकाऱ्यांची हस्तपुस्तिका’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

महाविकास आाघाडीकडून राज्यभरात निषेध आंदोलन सुरु आहे. पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळ्याफित्या आणि मुखपट्टी लावून निषेध आंदोलन