vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

कबूतर जीवन रक्षक प्रेमी कबूतरांचा जीव वाचवण्यासाठी आपल्या इमारतीच्या टेरेसवर दाणा-पाणी ठेवा : भवानजी

कबूतर जीवन रक्षक प्रेमी कबूतरांचा जीव वाचवण्यासाठी आपल्या इमारतीच्या टेरेसवर दाणा-पाणी ठेवा : भवानजी

मुंबई प्रतिनिधी #भाजपा चे वरिष्ठ हिंदुत्वनिष्ठ,नेते व मुंबईचे माजी उपमहापौर बाबूभाई #भवानजी यांनी म्हटले आहे की, कबूतरखान्यात दाणा टाकण्यास #मुंबईमहानगरपालिका ने स्थगिती दिल्याने कबूतरांचे संरक्षण करणे अत्यावश्यक झाले आहे. पर्यायी व्यवस्था होईपर्यंत सर्व संवेदनशील नागरिकांनी आपल्या-आपल्या इमारतींच्या टेरेसवर कबूतरांसाठी दाणा व पाण्याची सोय करावी.*

भवानजी म्हणाले की, मुंबईतील निवासी भागांमध्ये कबूतरखान्यांविषयी उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दादर (प.) येथील कबूतरखाना पालिकेने बंद केल्याने लाखो कबूतरांच्या अस्तित्वावर संकट आले आहे. त्यामुळे जीवदया प्रेमींमध्ये तीव्र संताप व असंतोष निर्माण झाला आहे. कबूतरांचे रक्षण करण्यासाठी सर्व जातिधर्मातील सनातनी हिंदू एकत्र आले आहेत.

भवानजी यांनी स्पष्ट केले की, “चिमणीला दाणा, कुत्र्याला भाकरी, जनावरांना चारा देणे ही भारताची ‘जगा आणि जगू द्या’ ही संस्कृती आहे. पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाला जगण्याचा हा मूलभूत अधिकार आहे. एकमेकांना मदत करणे ही आपली संस्कार परंपरा, मानवतेचा धर्म व माणसाचे कर्तव्य आहे.”

भवानजी यांनी जीवदया प्रेमींना आवाहन केले की, आपल्या इमारतीच्या टेरेसवर कबूतरांसाठी दाणा-पाण्याची व्यवस्था करा. कबूतरांसाठी ज्वारीचे दाणे मिळविण्यासाठी मला मो. 9819851828 येथे संपर्क साधावा. कबूतरांचे प्राण वाचवणे हेच एकमेव उद्दिष्ट आहे.*

*त्यांनी सुचविले की, मुंबईच्या सभोवताली समुद्रकिनारे आहेत. #कोलाबा, नरीमन पॉईंट, #गिरगाव, माळबार हिल, हाजी अली, #वरळी, #दादर, #माहिम, #बांद्रा, #जुहू, #अंधेरी ते दहिसर, भाऊचा धक्का, रे रोड, #वडाळा ते वाशीपर्यंतच्या समुद्र किनाऱ्यावर नियोजनबद्ध पद्धतीने कबूतरांसाठी चबुतरे बांधावेत, जेणेकरून आपली परंपरा, संस्कार व धार्मिक भावना जिवंत राहतील.

नवीन चबुतरे तयार होईपर्यंत तात्पुरता मार्ग काढून सध्याच्या चबुतऱ्यांमध्ये कबूतरांना दाणा-पाणी देण्याची वेळ दुपारी 2 ते 4.3अशी निश्चित करावी. तसेच रेसकोर्स मैदान, नॅशनल पार्क व पवईच्या जंगलांमध्ये कबूतरांना दाणा देण्याची परवानगी मिळाल्यास पक्षीप्रेमींना मोठी सुविधा होईल आणि कुणालाही अडचण होणार नाही.

भवानजी यांनी हे ही सुचविले की, सर्व धार्मिक स्थळांवर, मंदिरात तसेच त्यांच्या इमारतींच्या छतांवर उपाशी-प्यासी कबूतरांना दाणा-पाणी उपलब्ध करून द्यावे. पुढे भवानजी म्हणाले की, दादरचा कबूतरखाना हा ब्रिटिशकालीन वारसा असून हेरिटेज म्हणून संरक्षित आहे. न्यायालयाच्या आदेशाचा आम्ही आदर करतो, मात्र अशा आदेशांमुळे कबूतरांचा जीव धोक्यात येणे पूर्णपणे अन्यायकारक आहे. या विषयावर महाराष्ट्र शासन व पालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे. #highlightseveryone

संबंधित पोस्ट

नवी मुंबईत रंगणार ‘महाराष्ट्र MSME परिषद २०२६’२,५०० हून अधिक उद्योजकांच्या उपस्थितीत दिग्गजांचे होणार मंथन

100 दिवसांचा कृती कार्यक्रम’ अंतर्गत जिल्ह्यामध्ये 16 हजार 903 घरकुल लाभार्थ्यांच्या घरकुलांचे भूमिपूजन सोहळा

जन्म / मृत्यु प्रमाणपत्रासाठी स्वयंघोषणा पत्रासाठी अफीडेव्हीट / नोटरीची अट रद्द करा.काँग्रेस माथाडी कामगारचे मराठवाडा सरचिटणीस सय्यद अश्फाक अली यांनी घाटी दवाखान्याचे अधिष्ठाता डॉ शिवाजी सुक्रे यांना निवेदन दिले 

युजीसी नेट परीक्षेसाठी परीक्षा केंद्र-परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू..

झवेरी बाजार परिसराचा कायापालट करण्यास शासन सहकार्य करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपहिल्या ‘झवेरी बाजार जेम्स अँड ज्वेलरी फेस्टिवल 2025’ चे उद्घाटन

परराज्यातील अवैध मद्य वाहतूक प्रकरणी कारवाई; २ कोटी ३० हजाराचा मुद्देमाल जप्त