vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

100 दिवसांचा कृती कार्यक्रम’ अंतर्गत जिल्ह्यामध्ये 16 हजार 903 घरकुल लाभार्थ्यांच्या घरकुलांचे भूमिपूजन सोहळा

‘100 दिवसांचा कृती कार्यक्रम’ अंतर्गत जिल्ह्यामध्ये 16 हजार 903 घरकुल लाभार्थ्यांच्या घरकुलांचे भूमिपूजन सोहळा

 

ठाणे प्रतिनिधी -जिल्हा परिषद, ठाणे) – मा.मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार राज्यामध्ये ‘100 दिवसांचा कृती कार्यक्रम’ व ‘महा आवास अभियान सन 2024-25’ अंतर्गत राबविण्यात येत आहे. यामध्ये घरकुलांना उद्दिष्टाप्रमाणे मंजुरी देणे, मंजुर घरकुलांना पहिला हप्ता वितरीत करणे, सर्व घरकुले भौतिकदृष्टया पूर्ण करणे हे उपक्रम समाविष्ट आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या निर्देशानुसार जिल्हयात सर्वत्र एकाच दिवशी 16 हजार 903 घरकुल लाभार्थ्यांच्या घरकुलांचे भूमिपूजनाचा कार्यक्रम आज गुरुवारी, दि. 27 मार्च, 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता सर्व ग्रामपंचायती मध्ये आयोजित करण्यात आलेला होता.

  ठाणे जिल्ह्यातील केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत घरकूल योजनेंतर्गत एकूण 16 हजार 903 घरकुल लाभार्थ्यांचा घरकूल भूमीपूजन कार्यक्रम दि. 27 मार्च,2025 रोजी ग्रामपंचायत स्तरावर संपन्न झाला असून भिवंडी तालुक्यातील राहूर ग्रामपंचायतीमधील कुंभारपाडा येथे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या शुभहस्ते घरकूल भूमीपूजन करण्यात आला आहे. तसेच जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी शहापूर व मुरबाड येथील ग्रामपंचायतींच्या घरकूल भूमीपूजनास भेट दिली.

   कल्याण तालुक्यातील घोटसई ग्रामपंचायतीमध्ये घरकुल भूमीपूजन कार्यक्रम जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांचे उपस्थितीत पार पडला.  त्याअनुषंगाने जिल्हयात सर्वत्र ग्रामपंचायत स्तरावर ग्रामीण गृह निर्माण अभियंता, ग्रामपंचायत अधिकारी व स्थानिक लोक प्रतिनिधी यांच्या सहभागाने घरकूल भूमीपूजन कार्यक्रम राबविण्याबाबत ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी सर्व गट विकास अधिकारी यांना निर्देश दिले व घरकूल भूमीपूजन कार्यक्रमांमध्ये लोक प्रतिनिधी, ग्रामस्थ, लाभार्थी यांना मोठ्या प्रमाणात सहभागी करुन घरकूल भूमीपूजन कार्यक्रम राबविण्यात यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले होते.  ठाणे जिल्हयातील सर्व तालुक्यात गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता, ग्रामपंचायतींमधील लोकप्रतिनिधी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामस्थ व लाभार्थी यांच्या उपस्थितीत भूमीपूजन सोहळा पार पडला. जिल्हयात सर्वत्र ग्रामपंचायत स्तरावर ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली आहे.

000

संबंधित पोस्ट

शहरी नक्षलवादी संघटनांच्या कारवायांना चाप लावण्यासाठी आवश्यक महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर.

कबुतरखान्यांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात  आज तातडीची सुनावणी  – नागरिकांचे आरोग्य महत्त्वाचं,कबुतरखान्यांवरील बंदी कायम; हायकोर्टाचे निरीक्षण, समिती नेमण्याचे आदेश

vishwatmaklokswamivarta

शासकीय तंत्रनिकेतन, ठाणे येथे प्रथम व थेट द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी प्रवेशासाठी 11 सप्टेंबर रोजी संस्था स्तरीय फेरी

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्यातील शाळांना बारा दिवसांची दिवाळी सुट्टी जाहीर

vishwatmaklokswamivarta

आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत धारणी व चिखलदरा तालुक्यांचाडेल्टा रँकिंगमध्ये राष्ट्रीय-राज्य पातळीवर गौरव राज्यात पटकाविला अनुक्रमे पहिला व दुसरा क्रमांक 

सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखालीमहाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मध्ये सुधारणा संदर्भात बैठक.. 

vishwatmaklokswamivarta