vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जात वैधता प्रमाणपत्रे अनाधिकृत आढळल्यास कायद्यानुसार फौजदारी कारवाई, शिक्षा…

जात वैधता प्रमाणपत्रे अनाधिकृत आढळल्यास कायद्यानुसार फौजदारी कारवाई, शिक्षा…

            सांगली, प्रतिनिधी: गैरमार्गाने प्राप्त केलेली जातीचे प्रमाणपत्रे व जात वैधता प्रमाणपत्रे खोटी बोगस, अनाधिकृत अशी प्रमाणपत्र उघड होताच कायद्यानुसार फौजदारी कारवाई व शिक्षा होऊ शकते, असे जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती सांगलीचे उपायुक्त तथा सदस्य नागनाथ चौगुले यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

  जाती दावा सिध्दतेकामी / जाती दावा पृष्ठ्यर्थ सादर करणारे शालेय (शाळा सोडल्याचा दाखला, शालेय जनरल रजिस्टर), महसूली पुरावे (उदा. फेरफार उतारा, वारसनोंद उतारा, कडई पत्रक, 7/12 उतारा, खरेदीखत, गहाणखत, वारसनोंद उतारा, हक्कपत्रक) खरी व योग्य मार्गाने मिळवलेली आहेत याची खात्री करावी, कागदपत्रात कोणत्याही प्रकारचा अनाधिकृत बदल करु नये. अर्जदार, पालक, सख्खा भाऊ, बहिण, प्राधिकृत वकिल / प्रतिनिधी यांचे व्यतिरिक्त, त्रयस्थ व्यक्ती यांचेकडून प्रकरणाची चौकशी करण्यात येऊ नये. जात प्रमाणपत्र पडताळणी अधिनियमातील कलम 8 अन्वये जाती दावा सिध्द करण्याची जबाबदारी अर्जदाराची आहे.

  जात पडताळणीकरिता पुढीलप्रमाणे प्रवर्गनिहाय मानीव दिनांकापूर्वीचे पुरावे आवश्यक आहेत. अनुसूचित जाती – दिनांक 10 ऑगस्ट 1950 पूर्वीचे, विमुक्त जाती / भटक्या जमाती – दिनांक 21 नोव्हेंबर 1961 पूर्वीचे, इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्ग व सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग – दिनांक 13 ऑक्टोबर 1967 पूर्वीचे.

    जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे प्राप्त जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणी महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम 2000 व जाती प्रमाणपत्र पडताळणी नियमावली 2012 मधील तरतूदीनुसार तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय, शासन परिपत्रक, अधिसूचना यातील तरतूदीनुसार कार्यवाही केली जाते, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे

00000

संबंधित पोस्ट

बेलापूर पारसिक हिल येथे आषाढी एकादशीनिमित्त वृक्षारोपणातून हरित नवी मुंबईची रूजवात…

गडांचा राजा : राजगड

vishwatmaklokswamivarta

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपले पुणे जिल्ह्यातील दोन सुपुत्र – कौस्तुभ गानबोटे व संतोष जगदाळे या पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

महाराष्ट्रातील जीएसटी महसुलात १२.६ टक्क्यांची वाढ; राज्याच्या कर महसुलात विभागाचा दोन-तृतीयांश वाटा

अंबरनाथ सारख्या जागरूक व गतिमान शहरातील ही न्यायालयाची वास्तू न्याय, समता आणि लोकशाही मूल्यांचे प्रतिबिंब ठरेल, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी

केंद्र सरकारने लडाखच्या मुद्द्यांवर अ‍ॅपेक्स बॉडी लेह (एबीएल) आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स (केडीए) सोबत कधीही चर्चा करण्यासाठी नेहमीच तयारी दर्शवली आहे

vishwatmaklokswamivarta