vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज 750 व्या जयंती निमित्त नवी मुंबई महापालिका मुख्यालयात ‘भक्तिरंग’ सुप्रसिध्द गायक मंगेश बोरगांवकर आणि सहकारी यांची अभंग व भक्तीगीतांची स्वरयात्रा..

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज 750 व्या जयंती निमित्त नवी मुंबई महापालिका मुख्यालयात ‘भक्तिरंग’ सुप्रसिध्द गायक मंगेश बोरगांवकर आणि सहकारी यांची अभंग व भक्तीगीतांची स्वरयात्रा..

नवी मुंबई प्रतिनिधी-  सन 2025 हे वर्ष संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (750) जयंती वर्ष असून गोकुळ अष्टमी अर्थात शुक्रवार, दि. 15 ऑगस्ट 2025 रोजी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची 750 वी जयंती साजरी होत आहे. यानिमित्त सर्व शहरांमध्ये जयंती उत्सव साजरा करण्यात यावा असे मा.मुख्यमंत्री महोदय यांच्या संकल्पनेनुसार महाराष्ट्र शासनामार्फत निर्देशित करण्यात आले आहे.

 त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा 750 वा जयंती उत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येत असून यानिमित्त सायं. 4 वा. नमुंमपा मुख्यालयाजवळील पाम बीच मार्गावर रेल्वे लाईन पलिकडे असलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदानातील ओवी असलेल्या चित्रकविताभिंतीपासून सर्व्हिस रोडने महापालिका मुख्यालयापर्यंत पालखीतून दिंडी स्वरूपात मिरवणूक काढण्यात येत आहे.

    त्याचप्रमाणे या दिंडी स्वरूपातील मिरवणूकीची सांगता महापालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे होऊन सायं. 5 वा. तेथे ‘सा रे ग म प’ विजेते सुप्रसिध्द गायक श्री. मंगेश बोरगांवकर आणि सहकारी यांचा ‘भक्तिरंग’ हा अभंग व भक्तिगीतांचा विशेष संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.

   संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750 वी जयंती उत्सवानिमित्त शहरातील विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांनीही आपल्या विभागात अशा प्रकारच्या दिंडी स्वरूपातील मिरवणूक कार्यक्रमांचे आयोजन करून संत ज्ञानेश्वर महाराजांचा जयंती उत्सव उत्साहात साजरा करावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

 तरी दि. 15 ऑगस्ट 2025 रोजी, सायं. 5 वा. नवी मुंबई महानगरपालिकेने महानगरपालिका मुख्यालय, किल्ले गावठाण समोर, पाम बीच मार्ग, सेक्टर 15 ए, सीबीडी बेलापूर मधील ॲम्फिथिएटर येथे आयोजित केलेल्या ‘भक्तिरंग’ कार्यक्रमाप्रसंगी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींप्रती मनात असलेली श्रध्दा अभिव्यक्त करीत मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे

000000

संबंधित पोस्ट

विमानतळ परिसराचा १५ कि.मी.परीघ क्षेत्रात लेझर आणि बीम लाईट्सवर बंदी; पोलीस प्रशासनाचे आदेश

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेविषयी आवाहन

vishwatmaklokswamivarta

पीक-विशिष्ट उत्पादन कृषी योजनांचा जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत आढावा कृषी योजनांचा जिल्ह्यातील अधिकाधिक शेतक-यांना लाभ द्यावा जिल्हाधिकारी वर्षा मीना

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रविवारी (दि.२१)बिबी का मकबरा व विभागीय क्रीडा संकूलात सामुहिक योगासने

हेरिटेज दर्जा कायम ठेवून बी जे वैद्यकीय महाविद्यालयाच्याऑडिटोरियमचा पुनर्विकास करावा- ,बीजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एक हजार क्षमतेचे नवीन पदव्युत्तर विद्यार्थी वसतीगृह उभारण्यास तत्वतः मान्यता – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती…

नगर विकास विभाग प्रधान सचिव डॉ.के.एच गोविंदराज यांची पनवेल महापालिकेस भेट- विविध विकास कामांचा घेतला आढावा