
महाराष्ट्रातील,महापुरामुळे 4000 कोटीं रुपयांचं नुकसान, 209 जणांनी गमावला जीव, जनजीवन विस्कळीत.
गेल्या मुंबईसह महाराष्ट्रात जोरदार पावसाने पावसाने रौद्ररुप धारण केल्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडसह इतर जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत,. काही ठिकाणी दरडी कोसळल्या तर कुठे नदीने पात्र सोडून हाहा:कार,. अनेकांचे संसार उद्धवस्त झाले तर कुणाच्या घरावरील छप्पर नाहिसं झालं. या नैसर्गिक आपत्तीमधून प. महाराष्ट्र आणि कोकणातील लोक सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यभरातून त्यांना मदतीचा हातही दिला जातोय. मात्र, या पूरस्थितीमध्ये राज्याचं खूप मोठं नुकसान झालं आहे. प. महाराष्ट्र आणि कोकण जायबंदी झाले आहे. या दोन्ही विभागाला पूर्वपदावर येण्यासाठी कित्येकवर्ष लागतील. 2019 मध्ये आलेल्या पूरातून सावरत असतानाच 2021 मध्ये पुन्हा एकदा आभाळ फाटल्यागत पाऊस कोसळला अन् होत्याचं नव्हतं करुन गेला. या नैसर्गिक आपत्तीमध्ये 209 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर तब्बल 400 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मित्रांच्या कडून वृत्तानुसार, मागील वर्षभरात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानाची राज्याने केंद्राकडे जवळपास 3,700 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागतली. मात्र, केंद्र सरकारने राज्याला या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी 700 कोटी रुपयांची मदत केली होती. यंदा आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील सरकारी मालमत्तेचं जवळपास 4000 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. तर 209 जणांना जीव गमवावा लागला आहे. या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी राज्यातील ठाकरे सरकार घोषणा करण्याच्या तयारीत आहे., बुधवारी सायंकाळी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर कोकण आणि प. महाराष्ट्रला विशेष पॅकेज दिलं जाऊ शकतं. निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळाच्या धर्तीवर ठाकरे सरकारकडून ही मदत जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.



