
शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेच्यालाभाकरिता इच्छुकांनी अर्ज करावेत
रायगड( प्रतिनिधी- राज्यातील इतर मागासवर्गीय (OBC) समाजातील दुर्बल घटकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी शासनाने या महामंडळाची स्थापना केली आहे. समाजातील इतर मागासवर्गीयांच्या आर्थिक उन्नतीसाठी महामंडळामार्फत स्वयंरोजगाराच्या विविध कर्ज योजना राबविण्यात येतात.
योजनेचा उद्देश- इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरीता बँकेमार्फत मंजूर केलेल्या रू. 20.00 लक्ष पर्यंत कर्ज रकमेवरील व्याज परतावा महामंडळाकडून वितरीत केला जाईल.
योजनेचे स्वरूप- राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज मर्यादा रू. 10.00 लक्ष पर्यंत. परदेशी अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज मर्यादा रू. 20.00 लक्ष पर्यंत. कार्यपद्धती-ही योजना पुर्णपणे ऑनलाईन असून ज्या उमेदवारांना शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांनी आपले अर्ज महामंडळाच्या www.msobcfdc.org या संकेतस्थळावर जावून भरावयाचे आहेत.
लाभार्थी पात्रतेच्या अटी व शर्ती- अर्जदाराचे वय 17 ते 30 वर्ष असावे. अर्जदार हा इतर मागास प्रवर्गातील असणे तसेच तो महाराष्ट्राचा रहीवासी असावा. अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामिण व शहरी भागाकरीता रू.8.00 लक्ष पर्यंत असावी. अर्जदार हा इयत्ता 12 वी 60% गुणांसह उत्तीर्ण असावा तसेच पदवीच्या व्दितीय वर्षे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी 60% गुणांसह पदवीका (Diploma) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्जदाराचा सिबील क्रेडीट स्कोअर किमान 500 पेक्षा अधिक असावा,
कर्ज प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे- अर्जदाराचा इतर मागास प्रवर्गातील जामीचा दाखला. तहसिलदार यांचा नॉलक्रिमिलेयर दाखला. तहसिलदार यांचा महाराष्ट्र रहिवासी (वय अधिवास) दाखला. अर्जदार व अर्जदाराचे पालक यांचे आधारकार्ड. ज्या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक कर्ज आवश्यक आहे त्या अभ्यासक्रमासाठीची पात्रता परिक्षा उत्तीर्ण गुणपत्रिका. अर्जदार व अर्जदाराचे पालक यांचे पासपोर्ट फोटो. अर्जदाराचा जन्माचा/वयाचा पुरावा. शैक्षणिक शुल्क संबधित पत्र. शिष्यवृत्ती (Scholarship), शैक्षणिक शुल्कमाफी (Freeship), पात्रतेबाबतचे प्रमाणपत्र. मान्यताप्राप्त संस्थेत प्रवेश घेतल्याचा पुरावा. आधार संलग्न बँक खाते पुरावा. तसेच इतर आवश्यक कागदपत्रे / पुरावे.
शैक्षणिक कर्ज योजनेतंर्गत येणारे अभ्यासक्रम राज्यांतर्गत येणारे अभ्यासक्रम-आरोग्य विज्ञान – MBBS.BDS, BAMS, BHMS, B. Pharm, व संबधित विषयांतील सर्व पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रम. अभियांत्रिकी-B.E.B.Tech.,B.Arch (सर्व शाखा), तसेच संबधित विषयांतील सर्व पदवी व पदवीत्तर अभ्यासक्रम इ. व्यावसायिक अभ्यासक्रम LLB, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन टेक्नोलॉजी, इंटेरिअर डिझाईन पदवी, बचलर ऑफ डिझाईन, फिल्म व टेलीव्हिजन अभ्यासक्रम, पायलट, सनदी लेखापाल, MBA.MCA SHIPPING, विषयांतील पदवी व पदवीत्तर अभ्यासक्रम, इ. कृषी अन्नप्रकीया व पशुविज्ञान Animal & Fishery Sciences, B.Tech., BVSC, B.Sc. इ संबधित विषयांतील सर्व पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रम.
देशांतर्गत अभ्यासक्रम- केंद्रीय परिषद, कृषी विद्यापीठ परिषद, शासकीय अनुदानित व खाजगी मान्यताप्राप्त (NACC) अभ्यासक्रमासाठी प्रात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेले व प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरीता आहे. यात आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, व्यावसायिक व व्यवस्थापन, कृषी अन्नप्रक्रिया व पशुविज्ञान या अभ्यासक्रमाचा समावेश आहे.परदेशी अभ्यासक्रम-आरोग्य विज्ञान, विज्ञान, कला, अभियांत्रिकी, व्यावसायिक अभ्यासक्रम यामध्ये समाविष्ट अभ्यासक्रम.
व्याज परतावा व परतफेडीचा कालावधी- शिक्षण पूर्ण केलेल्या अर्जदाराने बँकेने मंजूर केलेल्या कर्जाची नियमीत परतफेड केलेल्या हप्त्यामधील नियमित असलेल्या व्या रकमेचा परतावा (कमाल 12 टक्के पर्यंत) महामंडळ अदा करेल. तसेच व्याज परतावासाठी जास्तीत जास्त 5 वर्षे कालावधी ग्राह्य धरण्यात येईल.अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालयाच्या खालील पत्यावर अथवा महामंडळाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.
कार्यालयाचा पत्ता- श्रीराम समर्थ गृहनिर्माण सह सो., पहिला मजला, रुम नं १०१, मारुती मंदिराच्या मागे, चेंढरे, अलिबाग,रायगड दुरध्वनी क्रमांक-02141-224448,ईमेल-dmobcalibagraigad@gmail.com,वेबसाईट- www.msobcfdc.org.
००००००



