
घाटकोपर येथे महाराष्ट्र जनरल माथाडी कामगार सेना आयोजित चित्रकला स्पर्धा
मुंबई प्रतिनिधी, घाटकोपर येथे मुंबई-महाराष्ट्रात काम करणाऱ्या शिवसेना पक्षाच्या महाराष्ट्र जनरल आणि माथाडी कामगार सेना यांनी पहिली ते पाचवी पर्यंत विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती,सदर चित्रकला स्पर्धेचा विषय स्वातंत्र्यदिन 15 ऑगस्ट हा होता.चित्र तयार करण्याची स्पर्धा आयोजित केली होती,महाराष्ट्र जनरल आणि माथाडी कामगार सेना चे महाराष्ट्र अध्यक्ष रविंद्र परब. यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथील घाटकोपर पश्चिम येथील एलबीएस मार्ग संघानेही इस्टेट मध्ये सदर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदर चित्रकला स्पर्धेमध्ये 50 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता यावेळी एपीजे अब्दुल कलाम हायस्कूल याच्या विद्यार्थिनी ऋतुजा शिरसागर याने प्रथम स्थान प्राप्त केले आणि इतर विद्यार्थ्यांना यावेळी प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला महाराष्ट्र जनरल कामगार सेना मुंबई चे उपाध्यक्ष साबीर खान यांनी, त्यासोबतच त्यांचे इतर पदाधिकारी खालिद खान, तहा खान, विकास चव्हाण, समीर खान, नरेंद्र साई राजू सरवदे, जरयाब शेख, भगवान म्हात्रे ,यश ठाकूर स्वप्निल घाडवे, राजू गोवर आणि संजय दादा भालेराव यांच्यासह सदर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यासाठी खूप मोठे प्रयत्न केले होते महाराष्ट्र जनरल माथाडी कामगार सेना ऑल इंडिया भारतीय कामगार सेना महासंघ यांच्याशी संलग्न आहे



