vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सूर्यपुत्र भय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर स्मृति अभिवादन कार्यक्रमाचे आयोजनडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची नात रमा तेलतुंबडे-आंबेडकर यांची विशेष उपस्थिती

,सूर्यपुत्र भय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर स्मृति अभिवादन कार्यक्रमाचे आयोजनडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची नात रमा तेलतुंबडे-आंबेडकर यांची विशेष उपस्थिती

छ. संभाजीनगर / प्रतिनिधी – सूर्यपुत्र भय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर प्रतिष्ठान छ. संभाजीनगर (औरंगाबाद) च्या वतीने सूर्यपुत्र भय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन बुधवार, दि. १७ सप्टेंबर २०2५ रोजी सायं. ५:३० वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, मराठवाडा साहित्य परिषद, रॉकसी सिनेमा जवळ, पैठण गेट, छ. संभाजीनगर (औरंगाबाद) येथे करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची नात रमा आंबेडकर-तेलतुंबडे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक तथा विचारवंत प्राचार्य डॉ. संजय मून हे असणार आहेत. प्रमुख वक्ते म्हणुन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय महासचिव अॅड. प्रियतदर्शी तेलंग, वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्ता उत्कर्षा रूपवते उपस्थित राहणार आहेत.

प्रमुख उपस्थिती म्हणुन ज्येष्ठ आंबेडकर साहित्यिक डॉ.ऋषिकेष कांबळे, सत्यशोधक समाज प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. के.ई. हरिदास, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. एस.आर. बोदडे, संत कबीर शिक्षण संस्थेचे सचिव धनंजय बोरडे, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. डी.व्ही. खिल्लारे, भारतीय बौद्ध महासभेचे इंजि. बी.जी. म्हस्के, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत खडसे, ज्येष्ठ बौद्ध साहित्यिक डॉ. धनराज गोंडाने आदी उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सूर्यपुत्र भय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. भारत सिरसाट, रतनकुमार साळवे, अनंत भवरे, डॉ. धोंडोपंत मानवतकर, आनंद चक्रनारायण, अमरदीप वानखडे, मधुकर गवंदे, राजन कीर्तने, डॉ.विनय हातोले, अशोक जोहरे, मधुकर खिल्लारे, सागर धोडपकर, यांच्यासह संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र ‘एनएसएस’च्या 12 स्वयंसेवकांचा-कर्तव्यपथावरील संचलनासाठी सराव

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून‘मासूम’ प्रकल्पाचा राज्यव्यापी विस्तार

महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणुकीसाठी मतदान करण्याचे आवाहन

जिल्ह्यात 4 एप्रिल रोजी ‘पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’आणि ‘मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण भरती मेळावा’ चे आयोजन· मेळाव्यामध्ये 204 रिक्त पदांसाठी होणार भरती..

धारावी की जंक्शन ते धारावी खाडी कलानगर भर रस्त्यात अस्वच्छता मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी लक्ष देतील का?

vishwatmaklokswamivarta

साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार प्रदान; डॉ. सुरेश सावंत यांच्या ‘आभाळमाया’ला मराठीसाठी पुरस्कार देशातील २४ भाषांतील बालसाहित्यिकांचा सन्मान

vishwatmaklokswamivarta