vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

फळ महोत्सवास भरभरून प्रतिसाद देऊन शेतकऱ्यांच्या मेहनतीला पाठबळ द्यावे- जिल्हाधिकारी अशोक काकडे- तीनदिवसीय फळ महोत्सवाचे उद्घाटन

फळ महोत्सवास भरभरून प्रतिसाद देऊन शेतकऱ्यांच्या मेहनतीला पाठबळ द्यावे- जिल्हाधिकारी अशोक काकडे- तीनदिवसीय फळ महोत्सवाचे उद्घाटन

        सांगली, प्रतिनिधी : फळ महोत्सवाच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेल्या फळांना नवरात्रीच्या पार्श्वभूमिवर हक्काची बाजारपेठ मिळाली आहे. पणन विभागाने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल असून, सांगलीकरांनी या फळ महोत्सवास भरभरून प्रतिसाद देऊन शेतकऱ्यांच्या मेहनतीला पाठबळ द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे केले.सांगली फळ महोत्सव-2025 च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील स्मृती भवन, मार्केट यार्ड येथे आयोजित या महोत्सवास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार, पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले, बाजार समिती सांगलीचे उपसभापती रावसाहेब पाटील, संचालक सर्वश्री संग्राम पाटील, शशिकांत नागे व प्रशांत मजलेकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विश्वास वेताळ, कृषि उपसंचालक धनाजी पाटील, पणन अधिकारी ओंकार माने आदि उपस्थित होते.

आपली सांगली, माझा अभिमान हे घोषवाक्य प्रत्येक सांगलीकराने मनात ठेवून सांगली जिल्ह्याच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन करून जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, सांगली जिल्ह्यात प्रयोगशील शेतकरी आहेत. येथील फळ उत्पादन वाढत आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील फळांच्या तोडीस तोड ही फळे आहेत. जतमधील पेरू, आटपाडी, कवठेमहांकाळ मधील ड्रॅगनफ्रुट आता चमकू लागले आहेत. पूर्वी आजारी असताना खाल्ली जाणारी फळे आता दैनंदिन खाल्ली जात आहेत. त्यामुळे या सेंद्रिय फळांचा आस्वाद सांगलीकरांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते फळ महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन पाहणी करत वेगवेगळ्या फळांची अधिक माहिती जाणून घेतली व शेतकऱ्यांशी संवाद साधला.

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, कोल्हापूर व कृषि उत्पन्न बाजार समिती, सांगली यांच्यावतीने उत्पादक ते ग्राहक थेट विक्री संकल्पनेतून “सांगली फळ महोत्सव-2025” चे आयोजन करण्यात आले असून, हा महोत्सव 21 सप्टेंबरपर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत सुरू राहणार आहे. या फळ महोत्सवात सांगली जिल्ह्यातील ड्रॅगनफ्रुट, डाळिंब, पेरू, सीताफळ व इतर फळ उत्पादक शेतकऱ्यांना फळ विक्रीसाठी मोफत स्टॅाल उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

00000

संबंधित पोस्ट

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘शिवशाही पुनर्वसन’ प्रकल्पाला बळकटी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तेरापंथ युवक परिषद जालना व भाजपा जालना महानगर तर्फे विविध सामाजिक उपक्रमांचे भव्य आयोजन

vishwatmaklokswamivarta

ओबीसी आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजनांसाठी पुरेसा निधी उपलब्ध-मंत्री अतुल सावे

वारणा धरणात 27.88 टी.एम.सी. पाणीसाठा

लोकशाहीच्या बळकटीकरणात मतदारांचा सहभाग महत्त्वाचा -जिल्हाधिकारी किशन जावळे,राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त निवडणुकीत उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान

vishwatmaklokswamivarta