vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अभिजात मराठी भाषा दिवस उत्साहात साजरा9 ऑक्टोबरपर्यंत ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन

अभिजात मराठी भाषा दिवस उत्साहात साजरा9 ऑक्टोबरपर्यंत ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन

        सांगली, प्रतिनिधी : जिल्हा मराठी भाषा समिती, सांगली व जिल्हा ग्रंथालय अधिकारी, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 3 ऑक्टोबर हा दिवस “अभिजात मराठी भाषा दिवस” म्हणून साजरा करण्यात आला. या अंतर्गत 9 ऑक्टोबर 2025 पर्यंत “अभिजात मराठी भाषा सप्ताह” साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहात जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ग्रंथप्रदर्शन आयोजित केले आहे. या ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ वाचक, विद्यार्थी, अभ्यासक, संशोधक व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

     मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी, भाषेचे संवर्धन होण्यासाठी, जनमानसामध्ये मराठी भाषेच्या अभिजाततेची ओळख व्हावी, अभिजात मराठी भाषेसंदर्भातील संशोधन, जनजागृती जास्तीत जास्त व्हावी याकरिता महाराष्ट्र शासनाने प्रतिवर्षी दि. 3 ऑक्टोबर हा दिवस “अभिजात मराठी भाषा दिवस” व दिनांक 3 ते 9 ऑक्टोबर हा कालावधी “अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या अनुषंगाने जिल्हा मराठी भाषा समिती, सांगली व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 3 ऑक्टोबर रोजी “अभिजात मराठी भाषा दिवस” उत्साहात साजरा करण्यात आला. त्या अनुषंगाने मराठी भाषेतील साहित्य आणि त्याचे सौंदर्य या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.    अभिजात मराठी भाषा दिवस व अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामध्ये आयोजित केलेल्या अभिजात मराठी ग्रंथांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक रघुराज मेटकरी यांचे हस्ते झाले. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे, प्रा. डॉ. विष्णू वासमकर, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी, स्थानिक नागरिक, ग्रंथालय प्रेमी व प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ग्रंथ प्रदर्शनामध्ये मराठी भाषेतील ललितेत वाड्मय ग्रंथ प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले आहेत.

   यावेळी ज्येष्ठ साहित्यिक रघुराज मेटकरी यांनी ‘मराठी भाषेतील साहित्य आणि त्यांचे सौंदर्य’ या विषयावर उपस्थितांना मराठी भाषेतील प्रसिध्द कवी व साहित्यिकांनी दिलेल्या योगदानाच्या अनुषंगाने कथा व कवितांच्या पंक्ती ओघवत्या शैलीत सादर करून उपस्थितांच्या मनामध्ये मराठी साहित्याविषयी उत्सुकता वाढेल व त्यांना वाचनासाठी प्रेरित केले. विशेषतः संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, कवी केशवसुत, कुसुमाग्रज, बालकवी, ना. धों. महानोर इत्यादी कवींच्या प्रसिध्द कवितांचे दाखले देत मराठी भाषेतील साहित्याचे सौंदर्य विषद केले

     प्रा. वासमकर यांनी मराठी भाषेच्या निर्मितीचा इतिहास व अभिजात भाषेसंदर्भात श्रोत्यांना माहिती दिली. प्रास्ताविकात जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे यांनी ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ आणि ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्याचा उद्देश स्पष्ट केला. मराठी भाषेतील गौरवशाली साहित्त्याचे वाचन करण्यासाठी आपल्या नजीकच्या सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये जाण्याचे उपस्थितांना आवाहन केले.

    कार्यक्रमाचे निवेदन कवी व ग्रंथपाल अल्ताफ मुजावर यांनी केले. ग्रंथपाल, ग्रंथालय प्रेमी, वाचक व स्पर्धा परीक्षांचे अभ्यास करणारे विद्यार्थी, साहित्य प्रेमी, नागरिक, कार्यालयातील कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

संबंधित पोस्ट

अपघातास कारणीभूत विजेचे खांब आणि रोहित्रांबाबत अधिक्षक अभियंता, आयुक्तांना नोटीसअन्यथा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार – अ‍ॅड. ईश्वर बिल्होरे…

vishwatmaklokswamivarta

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला मैला शुद्धीकरण केंद्रासाठी चिखली येथील जागा

मराठा समाजासाठी गठीत वंशावळ समितीस ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाची उद्या भाजपचे सुवेंदु कुमार शपथ घेणार*केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार*  

स्वच्छ सर्वेक्षण 2024’मध्ये आता स्वच्छ शहरांच्या नियमित क्रमवारीपेक्षा उच्च स्थानावर ‘सुपर स्वच्छ नवी मुंबई’**10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्येच्या शहरात ‘सुपर स्वच्छ लीग’ मध्ये समाविष्ट महाराष्ट्रातील एकमेव शहर**महामहिम राष्ट्रपती श्रीम.द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते स्विकारला सन्मान**यशाचे श्रेय सातत्य राखणा-या स्वच्छतामित्र, स्वच्छतासखी आणि सर्व नागरिकांचे*

vishwatmaklokswamivarta

रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामे प्रभावीपणे करून जतचा विकास साधावा-खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले

vishwatmaklokswamivarta