vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शहीद दिनानिमित्त क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांना अभिवादन; पालकमंत्र्यांसह इतर नेत्यांची उपस्थिती

शहीद दिनानिमित्त क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांना अभिवादन; पालकमंत्र्यांसह इतर नेत्यांची उपस्थिती

चंद्रपूर, प्रतिनिधी वीर शहीद क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या पुण्यतिथी निमित्त आज (दि. 21 ऑक्टो.) चंद्रपूर कारागृह परिसरातील पिंपळाच्या शहीद स्मारकाजवळ बाबुराव शेडमाके यांना आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी अभिवादन केले.

यावेळी राष्ट्रीय ओबीसी मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार किशोर जोरगेवार, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री डॉ. वुईके म्हणाले, वीर शहीद बाबुराव शेडमाके हे 1857 च्या स्वातंत्र्य लढ्यातील आद्य क्रांतिकारक होते. आदिवासी समाजाची आदर्श संस्कृती आणि गौरवशाली इतिहासाचे त्यांनी नेहमी जतन केले. हीच परंपरा आपल्याला सुद्धा पुढे न्यायची आहे. या शहीद स्मारकाजवळ अतिशय चांगली वास्तू निर्माण झाली पाहिजे. या वास्तू मधून आदिवासी समाजाची संस्कृती आणि गौरवशाली इतिहासाचे प्रदर्शन व्हावे, असा संकल्प करणे गरजेचे आहे. चंद्रपुरात आदिवासी समाजाचे सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही यावेळी पालकमंत्री डॉ अशोक वुईके यांनी दिली.

यावेळी इतरही मान्यवरांनी मार्गदर्शन केले. तसेच ‘अमर रहे, अमर रहे, बाबूराव शेडमाके अमर रहे’ आणि ‘जय सेवा, जय सेवा’ या घोषणांनी परिसर दुमदुमला. तत्पूर्वी उपस्थित सर्वांनी दोन मिनिट उभे राहून शहीद क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांना श्रद्धांजली अर्पण केली

0000

संबंधित पोस्ट

चिखली चे गट शिक्षण अधिकारी विरुद्ध कारवाई न झाल्याने दुसऱ्या दिवशी उपोषण सुरु शिक्षणाधिकारी प्राथमिक हेच पाठीशी घालत आहे

मेहकर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु

प्रत्येक मुलीने ‘एचपीव्ही’ लसीकरणाचा लाभ घ्यावा : पालकमंत्री जयकुमार रावल जागतिक महिला दिनानिमित्त दोंडाईचा येथे ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीमेचा शुभारंभ

समाधान शिबिराच्या माध्यमातून सर्व योजना एकाच छताखाली उपलब्ध- सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

प्रतिस्पर्ध्यांना आसमान दाखवत पै.शिवराज राक्षे, हर्षवर्धन सदगिर ठरले जलसम्राट केसरीचे मान—-जवळपास एक हजार मल्लांचा सहभाग @ बक्षिसापोटी लाखो रुपयांची लयलूट @ कुस्तीप्रेमिंच्या डोळ्याचे फिटले पारणे

vishwatmaklokswamivarta

आताची मोठी बातमी – सामाजिक कार्यकर्ते पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांचं केंद्रीय मंत्र्यांना पत्र; विद्यार्थ्यांवरील कारवाई न करण्याची मागणी

vishwatmaklokswamivarta