vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

राष्ट्रीय उपशामक काळजी जनजागृती मोहिमेंतर्गत वृद्धांसाठी आरोग्य शिबिर संपन्न…

राष्ट्रीय उपशामक काळजी जनजागृती मोहिमेंतर्गत वृद्धांसाठी आरोग्य शिबिर संपन्न…

      अमरावती, प्रतिनिधी: राष्ट्रीय असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ‘उपशामक काळजी’ ( पॅलिएटीव्ह केअर कार्यक्रम ) राबविला जातो. उपशामक काळजी कार्यक्रमांमध्ये दुर्धर आजारांनी त्रस्त रुग्णांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले जातात. तसेच रुग्णांना व त्यांच्या कुटुंबियांना शारीरिक मानसिक तसेच सामाजिक आधार दिला जातो.पॅलिएटिव्ह केअर ही रुग्णाच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यावर आणि सन्मानाने जगण्यावर लक्ष केंद्रित करते. जागतिक उपशामक काळजी दिवसाच्या (11 ऑक्टोबर) निमित्ताने, नुकतेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मधुबन वृद्धाश्रम’, कोंडेश्वर रोड येथे वयोवृद्ध नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात पॅलिएटीव्ह केअर वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी रुग्णांची तपासणी केली. परिचारिका पल्लवी जाधव व पल्लवी बोरकर यांनी तपासणीसाठी सहकार्य केले. श्रीमती पायल ठाकूर यांनी आरोग्य मार्गदर्शन तसेच शिबिराचे आयोजन केले. रुग्णांना आवश्यकतेनुसार औषधींचे यावेळी वितरणही करण्यात आले. ही सेवा ओ.पी.डी., आय.पी.डी. आणि गृहभेटी दरम्यान पुरविली जाते. जिल्हा सामान्य रुग्णालयात नियमित पॅलिएटीव्ह केअर ओ.पी.डी. सुरु आहे.

000000

संबंधित पोस्ट

कर्करोगाला चालना देणाऱ्या घटकांना निष्क्रिय करण्याची भविष्यातील नॅनो-औषधांमध्ये क्षमता

3.8 किलोच्या फुटबॉल एवढी आकाराची होती पोटात कॅन्सर ची गाठ !! कॅन्सर सदृश्य गाठ काढण्यासाठी सेंट जॉर्ज रुग्णालय मध्ये यशस्वी शस्त्रक्रिया -प्रसिद्ध प्राध्यापिका सर्जन स्त्रीरोग विशेषज्ञ डॉक्टर राजश्री दयानंद कटके 

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात १४ वर्षीय मुलींसाठी ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीम९ मार्चपासून सुरुवात

एच आय व्ही आणि इतर शारीरिकरित्या पसरणा-या आजारांविषयी जनजागृती कार्यक्रम’ संपन्न

vishwatmaklokswamivarta

उष्मालाट जनजागृती उपाययोजनेबाबत कार्यशाळा संपन्न…

vishwatmaklokswamivarta

जागतिक तंबाखू मुक्ती दिनानिमित्त मंत्रालयात जनजागृती कार्यक्रम तंबाखूचे अतिसेवन म्हणजे अनंत आजारांना निमंत्रण राज्यभर तंबाखू प्रतिबंध उपक्रम…