vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

15 ऑगस्ट रोजी सर्वच भारतीय 75वा स्वतंत्र दिन साजरा करण्याच्या तयारीत आहेत. 15 ऑगस्ट रोजी दिल्लीपासून ते जम्मू-काश्मीरपर्यंत अलर्ट जारी

 15 ऑगस्टला या ठिकाणी हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट; अलर्ट जारी…

प्रतिनिधी : 15 ऑगस्ट रोजी सर्वच भारतीय 75वा स्वतंत्र दिन साजरा करण्याच्या तयारीत आहेत. 15 ऑगस्ट रोजी दिल्लीपासून ते जम्मू-काश्मीरपर्यंत अलर्ट जारी करण्यात आला आहे. एवढंच नाही तर गुप्तचर संघटनांना देखील सतर्क राहण्यासाठी सांगण्यात आलं आहे. जैश आणि लष्कर संघटनेचे दहशतवदी हल्ला करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे सुरक्षा दलाने दिल्ली पोलीस, जीआरपी, लोकल पोलिसांना सतर्क राहण्यासाठी सांगितलं आहे.

महत्त्वाची सुरक्षा प्रतिष्ठाने दहशतवाद्यांच्या रडारवर आहेत. सुरक्षा दलाचे फॉरवर्ड पोस्ट आणि जवान दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. अलर्टमध्ये असे म्हटले आहे की, पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना आहे ज्याने भारतात शस्त्रे आणि आयईडी पाठवले आहेत. याबद्दल सर्व सुरक्षा दलांना विशेष चेतावणी देण्यात आली आहे.

कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळल्यास त्याची काळजीपूर्वक तपासणी करा आणि ते निष्क्रिय करताना खबरदारी बाळगण्याची सुचना देखील देण्यात आली आहे. त्यामुळे मेटल डिटेक्टरवर तैनात असणाऱ्या पोलिसांनीही विशेष काळजी घ्यावी आणि योग्य ती तपासणी करावी. असं देखील सांगण्याच आलं आहे.

महत्त्वाचं म्हणजे, 6 दहशतवादी कमांडर मोहम्मद सादिक यांच्या नेतृत्वाखाली POK मधील पोटल नावाच्या लाँचिंग पॅडवर सज्ज आहेत. तर जैश ए मोहम्मदचे 5 दहशतवादी POK मधील तदोते लाँचिंग पॅडवर तैनात आहेत. तर काही दहशतवादी घुसखोरीकरून जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला घडविण्याच्या तयारीत आहेत.

संबंधित पोस्ट

स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियान;दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान विविध उपक्रम

vishwatmaklokswamivarta

राजर्षि छत्रपती शाहु महाराज जयंतीनिमित्त गुरूवारी समता दिंडी, चित्ररथ…

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धे’चे अर्ज सादर करण्यास २६ तारखेपर्यंत मुदतवाढ सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांची घोषणा

महाराष्ट्र पोलीस दलाचे शौर्य अतुलनीय – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन-महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन साजरा

राज्यातील या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत उद्या मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार

vishwatmaklokswamivarta

प्रॉपर्टी एक्स्पो 2025’ प्रदर्शनाची नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केली पाहणी- प्रदर्शनातील नवी मुंबई महानगरपालिकेच्या माहितीप्रद स्टॉलला अनेक विकासक व नागरिकांची भेट

vishwatmaklokswamivarta