
डॉ. लहाने यांना आचार्य अत्रे पुरस्कार प्रदान
मुंबई : प्रतिनिधी. साहित्य सम्राट आचार्य अत्रे यांच्या जयंतीनिमित्त आत्रेय संस्थेतर्फे ना. राजेश टोपे यांच्या हस्ते आचार्य अत्रे पुरस्कार यंदा पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांना प्रदान करण्यात आले।
अत्रे यांची १२३ वी जयंती १३ ऑगस्ट रोजी आहे. सध्याच्या काळाच्या पार्श्वभूमीवर करोनाविरोधात लढलेल्या योद्ध्याला सन्मानित करण्याचा निर्णय समितीने घेतला. यामध्ये डॉ. लहाने यांची एकमताने निवड करण्यात आली. हा पुरस्कार करोनायोद्धे आणि महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांच्या हस्ते देण्यात आले तांत्रिक अडचणींमुळे हा पुरस्कार सोहळा १३ ऑगस्टऐवजी १२ ऑगस्टला साजरा
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या मुख्य सभागृहात सायं. ५ वाजता हा कार्यक्रम संपन्न झाला।
कार्यक्रमात यावेळी पद्मश्री डाॅ. तात्याराव लहाने, प्रमुख पाहुणे ना. राजेश टोपे, प्रमुख पाहुणे घनंजय मुंडे, मुंबई मराठी पत्रकार संघ चे अघ्यक्ष नरेंद्र वाबले, अन्य मान्यवर उपस्थिति होते.



