
देशात 24 तासात 40 हजार 120 नवे रुग्ण; 585 जणांचा मृत्यू कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढ.
नवी दिल्ली – प्रतिनिधी, कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या पुन्हा एकदा 40 हजरांच्या वर गेली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात देशात 40 हजार 120 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 585 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या देशात 3 लाख 85 हजार 227 रुग्णांवर उपचार सुरु आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3 कोटी 21 लाख 17 हजार 826 इतकी झाली आहे. आतापर्यंत 4 लाख 30 हजार 254 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाची सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात आहे. राज्यात गुरुवारी 6 हजार 388 नवे रुग्ण आढळले. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 63 लाख 75 हजार 390 इतकी झाली आहे. तर गुरुवारी दिवसभरात 208 जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या 1 लाख 34 हजार 572 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात 8 हजार 390 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 61,75,010 इतकी आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.86 टक्के एवढे झाले आहे.



