vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सोमवारी शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन विमाशि संघाचे प्रलंबित समस्‍यांबाबत आंदोलन…

सोमवारी शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन विमाशि संघाचे प्रलंबित समस्‍यांबाबत आंदोलन…

गडचिरोली प्रतिनिधी ः विभागीय शिक्षण उपसंचालक, नागपूर ह्या नागपूर येथे रुजू झाल्‍यापासून नागपूर विभागातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या शेकडो समस्‍या प्रलंबित असल्‍याने शिक्षकांमध्ये तीव्र असंतोषाची भावना असल्‍याने विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्‍वात सोमवार, दि. १० नोव्हेंबर २०२५ रोजी विभागीय शिक्षण उपसंचालक, नागपूर यांच्या कार्यालयासमोर दुपारी ३ वाजेपासून समस्‍या सुटेपर्यंत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.

आमदार सुधाकर अडबाले यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक, नागपूर यांच्यासोबत दि. ७ ऑक्‍टोंबर २०२५ रोजी जि. प. सभागृह, नागपूर येथे पार पडलेल्‍या समस्‍या निवारण सभेत दिलेल्‍या आश्‍वासनानुसार नागपूर विभागातील प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आलेली नाही. सभेचे इतिवृत्त अद्याप दिलेले नाही. नागपूर विभागातील जवळपास मार्च महिन्यापासून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून रुजू झालेल्या, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती झालेल्‍या, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या व अल्पसंख्याक दर्जा प्राप्‍त शाळा/महाविद्यालयांमध्ये नियुक्त शिक्षक – कर्मचाऱ्यांची शालार्थ आयडी प्रकरणे प्रलंबित आहेत. पोस्ट अटॅच – डिटॅचची कार्यवाही सुद्धा प्रलंबित आहेत. मा. शिक्षणाधिकारी (माध्य.) जि. प. भंडारा व अधीक्षक, वेतन पथक व भविष्य निर्वाह निधी (माध्य.) भंडारा यांच्या नियमबाह्य व अनियमितता प्रकरणांबाबत केलेल्‍या तक्रारीनुसार चौकशी समिती नेमण्यात आली. मात्र, अजूनही चौकशी समितीने चौकशी केलेली नाही. मा. आमदार सुधाकर अडबाले यांनी नागपूर विभागातील कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या समस्‍यांबाबत समस्‍या निवारण सभा आयोजित करण्याबाबत पत्र क्र. २३५४/२०२५, दि. २१/०९/२०२५ व पत्र क्र. २३८७/२०२५, दि. ०४/१०/२०२५ रोजी पत्र दिले होते. मात्र, लोकप्रतिनिधींनी दिलेल्‍या पत्रावर कोणतीही दखल मा. विभागीय शिक्षण उपसंचालक, नागपूर यांनी घेतलेली नाही व सभा आयोजित केलेली नाही. या मागण्यांना घेऊन विमाशि संघाच्या वतीने सोमवार, दि. १० नोव्हेंबर २०२५ रोजी विभागीय शिक्षण उपसंचालक, नागपूर यांच्या कार्यालयासमोर दुपारी ३ वाजेपासून समस्‍या सुटेपर्यंत ठिय्या / धरणे आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन मा. शिक्षण संचालक (माध्य. व उच्च माध्य.) पूणे, मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मुंबई, मा. आयुक्‍त (शिक्षण) पूणे यांना दिले आहे.

या ठिय्या आंदोलनात मोठ्या संख्येने नागपूर विभागातील पदाधिकारी, सदस्‍य व समस्‍याग्रस्‍त शिक्षक-कर्मचारी यांनी सहभागी होण्याचे आवाहन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्‍हाध्यक्ष रवींद्र नैताम, जिल्‍हा कार्यवाह अजय लोंढे आदींनी केले आहे.

संबंधित पोस्ट

बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यातल्या ब्रह्मगाव शिवारात वाघाचा वावर आढळून आल्यामुळे वनविभागानं या परिसरातल्या शेतकऱ्यांना सावधगिरी आपल्या जनावरांची सुरक्षितता राखावी आणि रात्री एकटं बाहेर पडू नये असं आवाहन

संपूर्ण नवी मुंबईत विविध विभागांत विठ्ठलनामाची शाळा भरवित विद्यार्थ्यांनी दिंड्यांतून जागविले स्वच्छता व आरोग्याचे महत्व…

जायकवाडीतील उपलब्ध पाण्याचे सुयोग्य नियोजन करा – पालकमंत्री संजय शिरसाट नाथसागर जलाशयाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते जलपूजन

दिलखुलास’ कार्यक्रमात पोलीस अधीक्षक -रूपाली अंबुरे यांची मुलाखत

आकाशवाणी आणि पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतर्फे १२ ऑगस्ट रोजी ‘नौसेना स्वरवंदना’ कार्यक्रमाचे आयोजन

पाणीपुरवठा विषयक जाहीर आवाहन*