vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारणस्थानिक बातम्या

मुंबई महानगरपालिकेच्या 227 पैकी 125 जागांवर निवडणुकीसाठी राज ठाकरेंची जोरदार तयारी..

मुंबई महानगरपालिकेच्या 227 पैकी 125 जागांवर निवडणुकीसाठी राज ठाकरेंची जोरदार तयारी..

मुंबई प्रतिनिधी- मुंबई महापालिका निवडणुकीची  तयारी करणाऱ्या उमेदवारांना प्रतीक्षा असणारी प्रभाग आरक्षण सोडत 11 नोव्हेंबर रोजी होणार आहे. मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 11 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबईच्या 227 प्रभागांसाठी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सगळ्याच राजकीय पक्षांची चाचपणी सुरु केली आहे. यामध्ये महाराष्ट्र निर्माण सेनेने देखील 227 प्रभागांचा आढावा घेतला आहे.

मुंबई महापालिकेच्या महाराष्ट्र निर्माण सेनेची 227 पैकी सव्वाशे जागांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (MNS) ताकद असल्याचा अंदाज समोर आला आहे. शिवसेना ठाकरे गटासोबतच्या युती आधी मनसेने मुंबई महापालिकेच्या 227 जागांचा आढावा घेतला. मनसेच्या मागील काही दिवसांपासून ज्या आढावा बैठका सुरू आहेत. त्यामध्ये मुंबईत आपली किती जागांवर ताकद आहे?, याची माहिती मुंबईतील पदाधिकारी नेत्यांकडून घेण्यात आली. शिवसेना ठाकरे गट आणि मनसे (Shivsena UBT MNS Alliance) यांची युती होण्याआधी दोन्ही पक्षांकडून आपण कोण कोणत्या जागांवर लढू शकतो कोणत्या जागांवर आपली ताकद आहे, याचा आढावा घेतला जातोय.

मनसेकडून जवळपास सव्वाशे जागांची यादी तयार- मनसेकडून जवळपास मुंबईतील 227 पैकी 125 जागांची यादी काढण्यात आली आहे. ज्यामध्ये मनसेकडे चांगले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास तयार आहेत. यामध्ये बहुतांश माहीम, दादर, परळ, लालबाग, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, जोगेश्वरी या मराठी मतदार मोठ्या संख्येने असलेल्या जागांचा समावेश आहे. जागावाटपाच्या चर्चेआधी मनसेकडून जवळपास सव्वाशे जागांची यादी तयार करण्यात आली आहे. युती झाल्यास यामध्ये मनसे आणि ठाकरे यांच्या शिवसेनेला किती जागा मिळणार हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी दोन्ही पक्षांकडून आपली ताकद असलेल्या जागा या बाजूला काढल्या जात आहेत. 11 नोव्हेंबरला आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने जागा वाटपाची चर्चा ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. जागा वाटपाचे कुठलेही सूत्र अद्याप ठरलेलं नसलं तरी मेरीटनुसार हे जागावाटप होईल, अशी सूत्रांची माहिती आहे.

 

मुंबई महापालिकेच्या प्रभाग आरक्षण सोडत कार्यक्रम खालील प्रमाणे:आरक्षित जागांची संख्या निश्चित करून आयोगाची मान्यता घेणे : 30 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 2025 आरक्षण सोडतीची जाहिर सूचना वृत्तपत्रात प्रसिध्द करणे : 6 नोव्हेंबर 2025 आरक्षणाची सोडत आणि निकाल जाहिर करणे : 11 नोव्हेंबर 2025 प्रारुप आरक्षणाबाबत हरकती व सूचना मागवणे : 14 नोव्हेंबर 2025 प्रारुप आरक्षण हरकती व सूचना मागवण्याची अंतिम तारीख : 20 नोव्हेंबर 2025 हरकती व सूचनांवर विचार करून आयुक्तांनी घ्यावयाचा निर्णय : 21 ते 27 नोव्हेंबर 2025 अंतिम आरक्षण जाहीर करून वृत्तपत्रात प्रसिध्द करणे : 28 नोव्हेंबर 2025

संबंधित पोस्ट

भाषिक भेदभावाची भूमिका संविधानविरोधी असून परप्रांतीयांवर दादागिरी करणे योग्य नाही ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

विकासकामांना पूर्ण वेगाने पूढे न्या – मुख्य सचिव सुजाता सौनिक-दोन आठवड्याच्यावर विकासकामे प्रलंबित ठेवू नये शासकीय कामात तंत्रज्ञानाचा वापर वाढवा…

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीदिनी मंत्रालयात अभिवादन

उच्च न्यायालयाचा निर्णय प्राप्त होताच लिपिक-टंकलेखक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार- माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार

रायगड जिल्ह्यात १८ मे अखेर ६४ टँकरद्वारे पाणीपुरवठा६४ गावे व २३० वाड्यांतील १ लाख १३ हजार ७०९ नागरिकांना दिलासा…

वारणा धरणात 28.23 टी.एम.सी. पाणीसाठा