
चुकीच्या सवयींमुळे तसेच दफ्तराच्या ओझ्यामुळे लहान मुलांना पाठदुखीचा त्रास होत होतो; परंतु लॉकडाऊनमध्ये दफ्तराचे ओझे कमी झाले असले, तरीही मोबाईल, कॉम्प्युटर तसेच लॅपटॉपच्या अतिवापरामुळे लहान मुलांना पाठदुखी, मानदुखी व मणक्याच्या आजारां
मुंबई : प्रतिनिधी : अभ्यासाला किंवा वर्गात बसण्याच्या चुकीच्या सवयींमुळे तसेच दफ्तराच्या ओझ्यामुळे लहान मुलांना पाठदुखीचा त्रास होत होतो; परंतु लॉकडाऊनमध्ये दफ्तराचे ओझे कमी झाले असले, तरीही मोबाईल, कॉम्प्युटर तसेच लॅपटॉपच्या अतिवापरामुळे लहान मुलांना पाठदुखी, मानदुखी व मणक्याच्या आजारांचा सामना करावा लागत आहे. वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या एका सर्वेक्षणात घरून काम करणाऱ्या नागरिकांसोबतच आठ ते १५ वयोगटातील मुलांमध्ये मानदुखी तसेच मणक्यांच्या आजारात वाढ झाल्याचे आढळले आहे.
याबाबत सिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचे संचालक डॉ. अभय गायकवाड यांनी साांगितले की, गेल्या वर्षभरात कोरोना महामारीचा सामना सर्वांनाच करावा लागत आहे. त्यामुळे शरीराची हालचाल ७० टक्के कमी झाली असून अनेकांना दिवसातले आठ ते १० तास कॉम्प्युटरवर काम करावे लागत आहे. तसेच, शालेय विद्यार्थ्यांनासुद्धा ४ ते ५ तास मोबाईल अथवा लॅपटॉपवर ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागत आहे. सतत सोफ्यावर, खुर्चीवर तसेच दिवसभर संगणकासमोर बसून काम केल्यामुळे लहान मुलांना मानदुखी व पाठदुखीचा त्रास वाढल्याच्या तक्रारींत वाढ झाली,
मुलांनी काय करावे? अनेक तास स्क्रिनसमोर बसणे मुलांच्या शरीरासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे डोळे, मान आणि स्नायूंवर अनावश्यक ताण पडतो. एका तासानंतर एक ब्रेक असायला हवा. या वेळेत मुलांनी घरी चालावे किंवा त्यांना छोटीशी कवायत करण्यास सांगावे. पाठीचा कडकपणा, थकवा व मानदुखी टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण घेताना मुलांच्या बसण्याच्या पद्धतीकडे पालकांनी लक्ष देणे आवश्यक आहे.



