vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अण्णासाहेब पाटील महामंडळाचे कामकाज सुरळीत • नवीन पात्रता प्रमाणपत्र प्रक्रिया लवकरच सुरू होणार • गैरव्यवहार करणाऱ्यांवर कारवाई

अण्णासाहेब पाटील महामंडळाचे कामकाज सुरळीत • नवीन पात्रता प्रमाणपत्र प्रक्रिया लवकरच सुरू होणार • गैरव्यवहार करणाऱ्यांवर कारवाई

 

बुलढाणा, प्रतिनिधी: अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे सर्व नियमित कामकाज सुरळीत सुरू असून, लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या व्याज परताव्याचे वितरण कोणत्याही अडथळ्याविना नियमितपणे केले जात आहे. सप्टेंबर २०२५ अखेर होल्ड व स्थगित प्रकरणे (ब्लॉक प्रकरणे वगळता) सोडून, व्याज परताव्यासाठी दावा करणाऱ्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर परतावा जमा करण्यात आला आहे.

     काही माध्यमांमध्ये महामंडळाचे कामकाज बंद असल्याच्या प्रसारित झालेल्या बातम्यांवर महामंडळाने स्पष्टीकरण दिले आहे. पात्रता प्रमाणपत्र (LOI) संबंधीची प्रक्रिया काही तांत्रिक कारणांमुळे तात्पुरती स्थगित करण्यात आली होती, मात्र व्याज परतावा व बँक मंजुरी प्रकरणांचे कामकाज सुरळीत सुरू आहे.

       अहिल्यानगर येथील गैरप्रकारांबाबत गुन्हा दाखल-   नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील काही एजंट आणि ट्रॅक्टर एजन्सी यांनी संगनमत करून, एकाच मोबाईल क्रमांक वापरुन अनेक प्रकरणे महामंडळाकडे दाखल केली होती. त्यातील काही व्याज परताव्याचे पैसे एजंटने स्वत:च्या खात्यावर घेतले असल्याचे निदर्शनास आले आहे. या माहितीची दखल घेत, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी अहिल्यानगरच्या पोलिस अधीक्षकांना त्वरित कारवाईसाठी पत्र दिले. पोलिस अधिक्षक यांनी तातडीने प्रकरणाची दखल घेत संबंधितांवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. नाशिक व अहिल्यानगर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये अनियमिततेबाबत गुन्हे दाखल झाले असून, या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती महामंडळाने दिली आहे. अशा घटना राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील एजंटमार्फत किंवा इतर यंत्रणांमार्फत घडल्या आहेत का, याची तपासणीदेखील महामंडळ करीत आहे.

नाशिक व अहिल्यानगर येथे घडलेल्‍या गैरव्यवहारासारखी प्रकरणे अन्य ठिकाणी घडू नये यासाठी Account Validation प्रणाली लागु करण्यात येत आहे. एजंटमार्फत दाखल केलेली अशी प्रकरणे महामंडळाने तात्पुरत्या स्वरुपात ब्लॉक केली आहेत. ज्‍या लाभार्थ्यांची प्रकरणे ब्लॉक केली आहेत अशा लाभार्थ्यांनी त्यांच्या मुळ कागदपत्रांसह आपल्या जिल्ह्याच्या जिल्हा समन्वयक यांना संपर्क करावा. जिल्हा समन्वयकांचा संपर्क क्रमांक www.udyog.mahaswayam.gov.in प्रणालीवर उपलब्ध आहे. यापुढे नागरी सुविधा केंद्र वगळता, अन्य प्रकरणी एकच मोबाईल क्रमांक/ लॉगीन करुन एकच प्रकरण दाखल करता येईल, अशी सुधारणा महामंडळाने प्रस्तावित केली आहे. पात्रता प्रमाणपत्र (LOI) च्या प्रक्रीयेमध्ये तांत्रिक सुधारणा पुर्ण करुन, शक्य तेवढ्या लवकर नवीन पात्रता प्रमाणपत्र (LOI) सुरु करणार असल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक यांनी दिली.

00000

 

संबंधित पोस्ट

सार्वजनिक आणि सरकारी भागीदारीचा नवा अध्याय युवकांसाठी अद्ययावत प्रशिक्षणातून रोजगार निर्मिती- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा,आयटीआय आणि टोयोटाच्या उभारलेल्या प्रयोगशाळांचे मंत्री लोढा यांच्या हस्ते उद्घाटन छत्रपती संभाजीनगरसह नागपूर विभागातील अद्ययावत प्रयोगशाळांचे अद्ययावतीकरण,उद्योगांना पूरक प्रशिक्षण

महानगरपालिका क्षेत्रातील कामगारांना मतदानासाठी सुट्टी द्यावी*कामगार उपायुक्तांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

केंब्रिज’सोबतचा सामंजस्य करार जागतिक दर्जाच्या शिक्षणाचा नवा टप्पा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

एकरकमी कर्ज परतफेड योजना’ राबविण्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे निर्देश

संस्कृती, प्रेम, शांती व सद्भावना राज्य अभियानाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन समाजात प्रेम, शांतता व सद्भावना निर्माण करण्याचे ब्रह्मकुमारींचे कार्य प्रशंसनीय- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणुकीसाठी मतदान करण्याचे आवाहन