vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

लेखक राजीव निळकंठ श्रीखंडे लिखित ग्लोबल साहित्य सफर भाग एक पुस्तक प्रकाशित…

लेखक राजीव निळकंठ श्रीखंडे लिखित ग्लोबल साहित्य सफर भाग एक पुस्तक प्रकाशित…

राज्य प्रतिनिधी-ज्यांच्या घरात 9000 पेक्षा देश विदेशातील पुस्तकांचा भंडार असलेले व सतत वाचनात रमलेले लेखक राजीव निळकंठ श्रीखंडे यांच्या पुुस्तकाचा पहिला भाग शासनाने अनुदान दिलेल्या ग्रंथाली आयोजित कार्यक्रम दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी साडेसहा ते साडेआठ या वेळात स्थळ दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र मुंबई येथे सन्माननीय सांस्कृतिक कार्यमंत्री एडवोकेट श्री आशिष शेलार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. ग्रंथाचे प्रकाशन रामदास भटकळ यांनी केले. भाषा विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी, ज्येष्ठ नाटककार अभ्यासक अभिराम भडकमकर या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सभागृहातील वाचक प्रेक्षक साहित्यिक यांच्या उपस्थितीत या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. लेखक राजीव निळकंठ श्रीखंडे यांनी आपल्या पुस्तकामध्ये काय कसे वाचायचे हे माझी आई नलिनी हिचे अनमोल सहाय्य, साहित्य सफर घडण्याकरता माझे बाबा निळकंठ यांनी तसेच पत्नी रेणुका (अदिती), मुलगी अरुंधती या सर्वांनी माझ्या प्रत्येक कामात साथ देऊन प्रोत्साहित केले. त्यामुळेच हे शक्य झाले असे मनोगत कृतज्ञतापूर्वक व्यक्त केले. या कामात ग्रंथालीचे सचिव सुरेश हिंगलासपूरकर, मुखपृष्ठकार श्री हेमंत जोशी, प्रस्तावना लेखक नंदन जोशी यांच्यामुळे शक्य झाले. कार्यक्रमांतर पुस्तक विक्री खरेदी करिता जे बाहेर पडले त्यापैकी धारावीतील जयराम सोनवणे लेखक कवी ,व श्री दिलीप गाडेकर वृत्तपत्र लेखक त्यांनी प्रथम राजीव श्रीखंडे यांचे पुस्तक खरेदी करून प्रत्यक्ष भेट घेऊन सदिच्छा दिल्या आणि आठवण म्हणून त्या पुस्तकावर त्यांची स्वाक्षरी घेऊन आपली उपस्थिती सोबतच छायाचित्र घेण्याचा लोभ आवरता आला नाही हे विशेष.

संबंधित पोस्ट

2024-25 वर्षाची खरीप पिकांची हंगामी पैसेवारी जाहीरजिल्ह्यातील 965 गावांची पैसेवारी 50 पैशापेक्षा कमी  – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल 

शाई पुसून गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणे शक्य नाही

vishwatmaklokswamivarta

मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती प्रलंबीत अर्ज महाविद्यालयांनी 24 जानेवारीपर्यंत निकाली काढावेत

vishwatmaklokswamivarta

कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भिड व नि:पक्ष पत्रकारिता करावी- पत्रकार अब्दुल कय्यूम,दर्पण दिनानिमित्त व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगच्या वतीने पत्रकार व त्यांच्या परिवारासाठी आयोजित आरोग्य शिबिर संपन्न…

नागरिकांच्या तक्रारी, सार्वजनिक समस्यांच्या जलद निराकरणासाठी प्रसिद्धी माध्यमांची होणार मदत – माहिती व जनसंपर्क प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांची माहिती

अभय योजनेचा लाभ घेण्याची 31 मार्च शेवटची संधी !थकबाकीवर ५० टक्के शास्ती माफी ३१ मार्च २०२६ रोजी रात्री 12 वाजेपर्यंतच मिळणार!