vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शांतिनिकेतन नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश!आपला पाल्य स्वतःच्या पायावर उभा राहिला यापेक्षा पालकांना दुसरा आनंद नसतो – भास्करराव अंबेकर

शांतिनिकेतन नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश!आपला पाल्य स्वतःच्या पायावर उभा राहिला यापेक्षा पालकांना दुसरा आनंद नसतो – भास्करराव अंबेकर

जालना, द (प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाच्या वतीने नुकताच नर्सिंग महाविद्यालयातील परीक्षांचा निकाल घोषित केला. जालना शहरातील समर्थ,शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शांतिनिकेतन नर्सिंग महाविद्यालयानेही अत्यंत चांगले यश मिळवून संस्थेची उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली. नर्सिंगच्या प्रथम वर्षातील या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव संस्थेचे अध्यक्ष भास्करराव अंबेकर यांच्या हस्ते व माजी सभापती देवनाथ जाधव, माजी नगरसेवक बाला परदेशी, प्राचार्य विकास राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गाढवे, शिवहरी मांटे,गणेश लाहोटी यांचीही उपस्थिती होती.प्रथम वर्षाच्या या परीक्षेत साक्षी लिपने हिने ८९.२० टक्के घेऊन प्रथम,शाफिया शेख हिने ८७.६० टक्के गुण घेऊन द्वितीय तर अभिषेक रणमळे याने ८५टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. या सर्वांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. महाविद्यालयातील ९ विद्यार्थी विशेष

प्राविण्य, २१ प्रथम श्रेणी तर ७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्णझाले. यावेळी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करतांना संस्थेचे अध्यक्षभास्करराव अंबेकर म्हणाले की, संस्थेची यशाची परंपरा नर्सिंग महाविद्यालानेही कायम ठेवली राखली आहे. प्रथम वर्षाच्या परीक्षेला बसलेलेसर्वच्या सर्व विद्यार्थी अत्यंत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन,महाविद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला त्याबद्दल त्यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे मन:पूर्वक अभिनंदन केले

नर्सिंगमध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या संधी असून विद्यार्थ्यांनी चांगलाअभ्यास करावा. संस्थेने नेहमीच दर्जेदार शिक्षणाला प्राधान्य दिले,दर्जेदार व चांगले शिक्षण मिळावे याकरिता आम्ही सातत्याने प्रयत्न करतअसतो. आपणांस उपलब्ध करून दिलेल्या चांगल्या संधीचा लाभ घेऊन आपण उत्तम ज्ञानप्राप्ती करावी. पाल्याने स्वतःच्या पायावर उभे राहण्यासारखा

पालकांना दुसरा आनंद नसतो. आई वडील हे आपल्याकडे अत्यंत आशेने पहात असतात. त्यांचीही आपल्याकडून काही स्वप्न असतात त्यांना तडा जाता कामा नये. असे सांगून अंबेकर पुढे म्हणाले की, नर्सिंग क्षेत्रात अत्यंतचांगल्या संधी आहेत. स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी अत्यंत चांगला अभ्यास करून यशस्वी होणे गरजेचे आहे. नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनाविदेशातही काम करण्याची मोठी संधी आहे. कोविडच्या काळात देशातपरिचारिकांनी अत्यंत कठोर परिश्रम घेऊन हजारो नागरिकांचे प्राण वाचविले.त्यामुळे आपला हा व्यवसाय अत्यंत महत्वाचा व नागरिकांच्या जीवन-मरणाशीसंबंधित असल्याचे सांगून त्यांचे कौतुक केले. सर्व शिक्षकांनी अत्यंत मेहनत घेऊन आपल्या विद्यार्थ्यांना घडविलेअसल्याने त्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले. तसेच नवीन विद्यार्थ्यांनीही जुन्या विद्यार्थ्यांचा आदर्श समोर ठेऊन कठोर अभ्यास करावा असे आवाहन केले. यावेळी शिक्षक विद्या भालेराव, लक्ष्मी वटाणे, पूनम गायकवाड, लिपिक

विशाल वाघ, तुकाराम चव्हाण आदींची यावेळी उपस्थिती होती.

०००००००फोटो ओळी……७- जालना शहरातील शांतिनिकेतन नर्सिंग महाविद्यालयानेही अत्यंत चांगले यश

मिळवून संस्थेची उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली. नर्सिंगच्या प्रथम

वर्षातील या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव संस्थेचे अध्यक्ष भास्करराव अंबेकर यांच्या हस्ते करण्यात आला.

संबंधित पोस्ट

आशियाखंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी विभागातील गणेशोत्सवाच्या मंडळाच्या गणपती बाप्पाच्या सुंदर मुर्त्या गणेश भक्तांच्या दर्शनाकरिता..

बेटी बचाव बेटी पढाओ योजनेच्या 10 वर्ष पुर्तीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे- निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठांचा लाभासाठी शुक्रवारी उत्पादक खरेदीदार संमेलन- जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

गरजुंपर्यंत प्रभावीपणे लाभ पोहोचवावा-केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

vishwatmaklokswamivarta

नांदेडमधील सहस्त्रकुंड धबधब्यात अडकल्या 5 महिला अन् 2 लहान मुलं यांना सुखरूप बाहेर काढले

vishwatmaklokswamivarta

श्री. क्षेत्र पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांसाठी आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्यासर्व एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक