vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती वरच्या बंदीने लाखो मूर्तीकार बेरोजगार होणार

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती वरच्या बंदीने लाखो मूर्तीकार बेरोजगार होणार

 

( सुरेश गायकवाड )

मुंबई- प्लास्टर ऑफ पॅरिसने बनविण्यात येणाऱ्या गणेशमूर्तीला सरकारने बंदी घातल्याने ज्या हाताने मूर्ती घडविल्या जातात त्या हातांनाच काम नसल्याने बेरोजगार होणार आहे त्यामुळे लाखो रुपयांचा आर्थिक महसूल बुडू शकतो तरी सरकारने मूर्तीकारांच्या जीवनामरणाचा प्रश्न मार्गी लावावा यासाठी मूर्तीकार संघटनेने मागणी केली आहे.

त्या मागणीचा सरकारने विचार करावा. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव हा जनतेने सर्वधर्मसमभाव राखून एकत्र येऊन साजरा करावा यासाठी सुरुवात केली. आणि आज जवळजव १३० वर्षाहून अधिक कालावधी होऊनही सद्यस्थितीत ही सर्वधर्मसमभाव राखून, एकोपा जोपासून सर्व जातीयधर्मीय लोक हा उत्सव साजरा करतात. असा हा उत्सव साजरा करण्यासाठी सरकार पीओपीच्या नावाखाली गणेश मूर्ती बनविणाऱ्या गणेश मूर्तीकारांवर अन्याय करीत असल्याची भावना गणेश मूर्तीकारांची झाली आहे.

  एकंदरीत गणेश मूर्तीकारांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांच्या मागण्यांचा विचार करावा. आणि सरकारने याप्रश्नी शास्त्रज्ञांची समिती गठित करून हा प्रश्न मार्गी लावावा.

 अन्यथा सरकारच्या विरोधात सनदशीर मार्गाने आंदोलन सुरू करणार असल्याचा इशारा हितेश जाधव, प्रशांत देसाई, संतोष कांबळी, संतोष दिघोळे यांनी दिला आहे.

संबंधित पोस्ट

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु….

शेतकऱ्यांनी रेशीम शेती करून समृध्द व्हावे  -जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ गावातील 70 शेतकऱ्यांनी केली नोंदणी

vishwatmaklokswamivarta

कोल्हापूरच्या महापौर श्रीमती रूपाराणी निकम यांनी मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांची बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महापौर दालनात आज  सदिच्छा भेट घेतली.

केंद्रीय अर्थसंकल्प : युवाकेंद्रित, शेतकरीहितासह सर्वसमावेशक विकासाचा ठोस रोडमॅप – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

vishwatmaklokswamivarta

ड्रोन उड्डाणास प्रतिबंध

vishwatmaklokswamivarta

उरण टपाल कार्यालयासाठी जागेची मागणी-इच्छुकांनी 28 एप्रिल पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन…