vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सकलेचा नगरवासीयांची नागरी समस्यांपासून होणार मुक्तता, भास्कर आबा दानवे यांच्या पुढाकाराने कामांना सुरुवात…

सकलेचा नगरवासीयांची नागरी समस्यांपासून होणार मुक्तता, भास्कर आबा दानवे यांच्या पुढाकाराने कामांना सुरुवात…

जालना (प्रतिनिधी): शहरातील सकलेचा नगर भागात उघडी गटारे, रस्त्यावर तुंबलेले पाणी, बंद पथदिवे अशा नागरिक समस्यांनी येथील रहिवाशांचे जगणे मुश्किल केले होते. महानगरपालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही कुठलीच दखल घेतली जात नसल्याने अखेर भारतीय जनता पार्टीचे महानगर जिल्हाध्यक्ष भास्करराव पाटील दानवे यांच्याकडे रहिवाशांनी कैफियत मांडली असता त्यांनी तातडीने यंत्रणा हालवून शनिवारी ( ता.29) प्रत्यक्ष कामास सुरुवात केली.

संकलेचा नगर भागात गुत्तेदाराने नालीचे बांधकाम अर्धवट सोडून भुयारी गटाची जोडणी व्यवस्थित केली नव्हती.गटारावर ढापे न टाकता उघडे ठेवून पेवर ब्लॉक सुद्धा बसवले नाही ,परिणामी परिसरात रस्त्यावर तुंबलेल्या गटारीच्या पाण्यातून रहिवाशी, शालेय विद्यार्थ्यांना ये-जा करावी लागत होती. बंद पथदिव्यांमुळे चोऱ्यांचे प्रमाणही वाढले होते. वर्षभरापासून मनपा प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याने येथील रहिवाशी मेटा कुटीस आले. दोन दिवसापूर्वी भास्करराव पाटील दानवे यांनी या भागात भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.आज सकाळी यंत्रणेसह प्रत्यक्ष कामास सुरुवात केली. त्याबद्दल रहिवाशांनी रमेशचंद्र अग्रवाल ( फरशीवाले ) यांच्या निवासस्थानी भास्करराव पाटील दानवे यांचा सत्कार केला.

यावेळी माजी नगरसेवक जीवन सले, सुनील राठी, धनराज काबलीये, रमेशचंद्र अग्रवाल ( फरशीवाले ) ,प्रवीण मोहता ,शांतीलाल सकलेचा ,अरुण अग्रवाल, द्वारकादास चेचानी ,कैलासचंद आगीवाल, पंकज गौड ,सौरभ सकलेचा ,नितीन अग्रवाल ,आदेश कोटेचा ,प्रकाश आगीवाल, रामेश्वर मंत्री ,रोहित नलावडे ,चोरमारे यांच्यासह परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.

0000

संबंधित पोस्ट

अवैध सावकारांकडील 74 हेक्टर शेतजमीन शेतकऱ्यांना परत 55 प्रकरणांत गुन्हे दाखल 651 प्रकरणांची चौकशी पूर्ण…

vishwatmaklokswamivarta

सिंधुदुर्ग जिल्ह्यात बसेसची संख्या वाढवावी- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक· परिवहन सेवा सक्षम करण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

पीक प्रात्याक्षिक घटकासाठी शेतकरी गटांनी पोर्टलवर अर्ज करावेत

vishwatmaklokswamivarta

स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 करिता नवी मुंबई महानगरपालिका सज्ज**सर्वेक्षणाच्या टुलकीटनुसार करावयाच्या कार्यवाहीचा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी घेतला सविस्तर आढावा*

vishwatmaklokswamivarta

उद्यापासून सुरु होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक.

vishwatmaklokswamivarta

गर्भलिंग निदानाविरुद्ध जनजागृती करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी