vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नोव्हेंबर महिन्यातील 8 निवृत्त नवी मुंबई महापालिका अधिकारी, कर्मचारी यांचा सन्मान…

नोव्हेंबर महिन्यातील 8 निवृत्त नवी मुंबई महापालिका अधिकारी, कर्मचारी यांचा सन्मान…

 

       नवी मुंबई प्रतिनिधी-   नवी मुंबई महानगरपालिका सेवेतून नोव्हेंबर महिन्यात निवृत्त होणा-या 8 अधिकारी, कर्मचारी, शिक्षक यांचा सेवानिवृत्ती सन्मान समारंभ महापालिका मुख्यालयात ज्ञानकेंद्रामध्ये संपन्न झाला. यावेळी महापालिका सेवेतून सेवानिवृत्त होणा-या प्रशासकीय अधिकारी श्री. विष्णू धनावडे, मुख्याध्यापक श्री. मधुकर गायकवाड, प्राथमिक शिक्षिका श्रीम. बिल्किस खलीफे, स्टाफ नर्स / नर्स मिडवाईफ श्रीम कॅथरीन सिडनी, वाहन चालक श्री. किरण वैद्य, शिपाई श्री. रविंद्र अहिरे, कक्षसेविका श्रीम. विमल वाघपंजे तसेच स्वेच्छानिवृत्ती स्विकारणारे सहा.आयुक्त श्री. उत्तम खरात यांना सन्मानीत करण्यात आले. याप्रसंगी अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड, महापालिका सचिव श्रीम.चित्रा बाविस्कर, मुख्य विधी अधिकारी श्री. अभय जाधव, बेलापूर विभागाचे विभाग अधिकारी श्री. प्रशांत नेरकर, प्रशासकीय अधिकारी श्री. रवी जाधव आदी मान्यवर तसेच इतर अधिकारी, कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचा-यांचे कुटूंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   दैनंदिन कामकाजीची आपल्याला इतकी सवय लागलेली असते की सेवानिवृत्तीनंतरचा पहिला दिवस हा इतक्या वर्षाची सवय बदलण्यासाठी कठीण जातो. हे स्थित्यंतर पचविणे आणि निवृत्तीनंतरच्या दिवसात 24 तासांचे नियोजन करणे गरजेचे असल्याचे सांगत उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांनी कामाच्या चक्रात आवडते छंद जोपासणे व इतर राहून गेलेल्या गोष्टी सेवानिवृत्तीनंतर मनापासून करा असे सांगत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

     महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर यांनी कवितेतून शुभेच्छा दिल्या. मुख्य विधी अधिकारी श्री. अभय जाधव, प्रशासकीय अधिकारी श्री. रवी जाधव व इतर अधिकारी – कर्मचारी व कुटूंबियांनी शुभेच्छापर मनोगते व्यक्त केले. सत्कारमूर्तींच्या वतीने मनोगत व्यक्त करतांना प्रशासकीय अधिकारी श्री. विष्णू धनावडे यांनी महानगरपालिकेत केलेल्या सेवाकार्याचा यथोचित गौरव केल्याबद्दल आभार मानत कर्मचा-यांनी आपले काम नियोजनबध्द रितीने वेळेत पूर्ण करावे, त्याचप्रमाणे कुटूंबासाठीही वेळ द्यावा आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करु नयेअसे सांसांगितले.

0000

संबंधित पोस्ट

रुग्णसेवेचा विचार करून डॉक्टरांनी संप मागे घ्यावा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका नागरिकांसाठी महत्वाचे आवाहन*

कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरात दोन्ही शिवसेनेकडून घंटानाद आंदोलन-हिंदूंना प्रार्थनेची परवानागी नाकारल्याचा निषेधार्थ सेनेकडून घंटनाद सुरूच

राष्ट्रीय लोकअदालत मध्ये 1817 वादपूर्व प्रकरणे निकालीएकूण वीस कोटी अडोतीस लाख दहा हजार पाचशे तेहतीस रुपयांची वसुली..

vishwatmaklokswamivarta

दिल्लीतमहिलासाहित्यसंमेलन ; डॉ. शारदा चोंडेकरांच्या प्रतिभेची दखल ..

बातमी प्रसिद्धीचा राग मनात धरुन पत्रकार विष्णु कदम यास मारहाण करणार्‍यांवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीसीएमची मागणी

vishwatmaklokswamivarta