
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ; यूपीत FIR दाखल होण्याची शक्यता…
मुंबई- प्रतिनिधी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपने उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात FIR दाखल करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल २५ ऑक्टोबर २०२० च्या दसरा मेळाव्यात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या मुद्द्यावरुन भाजप उद्धव ठाकरे यांच्याविरोधात FIR दाखल करणार आहे. (Maharashtra Latest News)नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानशिलात लगावण्याची भाषा केली होती. त्यानंतर शिवसेना आक्रमक झाली. शिवसैनिकांकडून राणेंविरोधात विविध पोलीस ठाण्यास तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. राणेंना जामीन मिळाला आहे. पण, शिवसेनेकडून ही कारवाई सुडबुद्धीतून करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे. आता शिवसेनेला जशासतसे उत्तर देण्यासाठी भाजप उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना हार घालायला हा योगी चप्पल घालून जातो. वाटते तर असे की, तीच चप्पल घ्यावी आणि त्याच्या थोबाडात हाणावी, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलं होतं. याचा आधार घेत भाजप शिवसेनेला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडिओ भाजपने बुधवारी व्हायरल केला. यानंतर मुख्यमंत्र्यांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करावे, अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. त्यानंतर विविध पोलीस ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पुढे या प्रकरणात काय होतं याकडे सगळ्याचं लक्ष असणार आहे.



