vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

दक्षिण मुंबईतील बेलसिस पुलाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दक्षिण मुंबईतील बेलसिस पुलाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई प्रतिनिधी-कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबईचे सह पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रयत्नांना यश आले असून दक्षिण मुंबईतील बेलसिस पुलाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. यासंदर्भात मंत्री लोढा यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

ब्रिटिशांच्या खुणा सांगणाऱ्या या पुलाचे नाव मेजर जनरल जॉन बेलासिस असे होते. हे नाव बदलण्यासाठी मंत्री लोढा यांनी सातत्याने मुंबई महापालिकेकडे तसेच राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही या मागणीला मान्यता देऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा सन्मान केला आहे. मोडकळीला आलेल्या या पुलाची पुनर्बांधणी आता पूर्ण झाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवार २६ फेब्रुवारी रोजी ऑनलाईन या पुलाचे उद्घाटन होणार आहे.

संबंधित पोस्ट

बीजोत्पादनातून महिला सक्षमीकरणाचा ‘जालना पॅटर्न’

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी घेतले महाराष्ट्र सदनात ‘श्री गणेशा’चे दर्शन

vishwatmaklokswamivarta

*राष्ट्रीय लोक अदालतीत १७ हजार ९२० प्रकरणांचा निपटारा**६१ कोटी १३ लाख रुपयांची तडजोड रक्कम वसूल*

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहिम

सोन्याच्या तस्करीप्रकरणी मुंबई सीमाशु्ल्क विभागाने दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक केली

सर्वपक्षीय बैठकीत मंजूर विषयांवर महासभेत विरोध करणे चुकीचे;ठाण्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे : महापौर शर्मिला पिंपळोलकर