vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधान भवन येथे”जावे विनोदाच्या गावा” विशेष कार्यक्रम• श्रेष्ठ लेखकांच्या साहित्यकृतींचे अभिवाचन• “लोकसेवेचा लोकजागर” ग्रंथाचे प्रकाशन

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधान भवन येथे”जावे विनोदाच्या गावा” विशेष कार्यक्रम• श्रेष्ठ लेखकांच्या साहित्यकृतींचे अभिवाचन• “लोकसेवेचा लोकजागर” ग्रंथाचे प्रकाशन

        मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्र विधानमंडळातील मध्यवर्ती सभागृहात यंदाच्या मराठी भाषा गौरव दिनी म्हणजेच २७ फेब्रुवारी, २०२६ रोजी “जावे विनोदाच्या गावा” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन तसेच वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे संपादित “लोकसेवेचा लोकजागर” या ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. कविश्रेष्‍ठ कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा केला जातो.

 

मराठी भाषेची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी व तिचे संवर्धन करण्यासाठी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातर्फे दि. २७ फेब्रुवारी, २०२६ रोजी सकाळी १०.०० ते ११.४५ यावेळेत “जावे विनोदाच्या गावा” या कार्यक्रमाचे संयोजन मा. प्रा. राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधानपरिषद, मा. ॲड. राहुल नार्वेकर, अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा, मा. डॉ. नीलम गोऱ्हे, उप सभापती महाराष्ट्र विधानपरिषद आणि मा. श्री अण्णा बनसोडे, उपाध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा यांच्या संकल्पनेनुसार करण्यात आले आहे.

        याप्रसंगी वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे संपादित “लोकसेवेचा लोकजागर” या ग्रंथाचे प्रकाशन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते आणि सर्व महनीय व्यक्तींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, विधिमंडळ मराठी भाषा समिती प्रमुख आशुतोष काळे यांच्या सन्मान्य उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.

 

        “जावे विनोदाच्या गावा” या कार्यक्रमात अभिजात मराठी साहित्यातील विनोदाचे दालन उलगडले जाईल त्याचप्रमाणे “आचार्य अत्रे व पु.ल. देशपांडे : विनोदाची दोन शिखरे” या विषयावर वक्ते मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद हे संवाद साधतील. कार्यक्रम संकल्पना उत्तरा मोने यांची असून केदार शिंदे, हृषिकेश जोशी, श्रीरंग भावे, अदिती प्रभुदेसाई, धनश्री दामले यांचा अभिवाचक आणि गायक म्हणून सहभाग असेल. मराठीतील श्रेष्ठ लेखकांच्या अभिजात साहित्याचे यावेळी अभिवाचन तसेच मराठी गीतांचे सादरीकरण यावेळी होईल. या कार्यक्रमास दोन्ही सभागृहांचे सन्माननीय सदस्य, अधिवेशन वार्तांकनासाठी उपस्थित पत्रकार अशा सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातर्फे सचिव-१ श्री.जितेंद्र भोळे यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

राज्य शासनाचे पायाभूत सुविधा क्षेत्रातील सर्वोत्तम काम बँकांसाठी आश्वासक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पायाभूत सुविधा विकासासाठी बँकांकडून नेहमीच सर्वोत्तम सहकार्य..

चांदिवली परीसरात अंमली पदार्थविरोधी मोहीम : मोठ्या प्रमाणात कारवाई करणार- गृहराज्यमंत्री योगेश कदम

राज्यातील अनेक भागात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत.🌧️ रत्नागिरी जिल्ह्यात दुपारपासून मुसळधार पावसाने किनारपट्टी भागात अतिवृष्टी…

vishwatmaklokswamivarta

हिंद-दी-चादर” कार्यक्रमाच्या अनुषंगाने कोकण विभागीय आयुक्तांनी कार्यक्रमस्थळी केली पाहणी…

शास्त्रीय कला, चित्रकला व लोककला सवलतीच्या प्रस्तावांना वाढीव मुदत· 31 जानेवारी अंतीम मुदत

विशेष लेख- 1 एप्रिल हा दिवस भारतासाठी अतिशय महत्त्वाचा- रिझर्व बँक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर