vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुक

*पं. अजितकुमार कडकडे यांची भव्य ‘संगीत रजनी’ बोरीवलीत!

*पं. अजितकुमार कडकडे यांची भव्य ‘संगीत रजनी’ बोरीवलीत!

*मुंबई,* प्रतिनिधी भक्तीगीतांच्या सुमधुर सादरीकरणाने आणि भावस्पर्शी गायनशैलीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे प्रख्यात ज्येष्ठ गायक, गानसम्राट गोमंतक पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित पं. अजितकुमार कडकडे यांची विशेष ‘संगीत रजनी’ दिनांक १८ मार्च,रोजी, रात्री ८.३० वा बोरीवली येथे आयोजित करण्यात आली आहे.

‘दर्शन क्रिएशन्स’ आणि ‘शु-हर्ष इंटरप्राइझेस’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात भक्ती, नाट्यसंगीत आणि भावगीतांचा सुरेल संगम रसिकांना अनुभवता येणार आहे.

या संगीत रजनीत पं. अजितकुमार कडकडे आपल्या अत्यंत लोकप्रिय आणि कालातीत रचना सादर करणार आहेत. ‘करा हो’, ‘गुरूचा जयजयकार’, ‘श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ’, ‘ओम श्री साईबाबा’, ‘गण गण गणात बोते’, ‘श्रीराम जय राम जय जय राम’, ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’, ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’, ‘ओम नमः शिवाय’ यांसारख्या भक्तिमय गीतांचा आनंद रसिकांना प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे.

पं. अजितकुमार कडकडे यांच्या चाहत्यांची ‘पं. अजितकुमार कडकडे संगीत रजनी’ व्हावी इच्छा होती, हीच भावना लक्षात घेऊन दर्शन क्रिएशन्स आणि शु-हर्ष इंटरप्राइझेस यांनी पुढाकार घेत पंडितजींना विनंती केली असता त्यांनी रसिकांसाठी आनंदाने होकार दिला, असे आयोजक समीर बापर्डेकर यांनी सांगितले

हा बहुप्रतीक्षित कार्यक्रम प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरीवली येथे बुधवार, १८ मार्च रोजी रात्री ८.३० वाजता सादर होणार आहे. “पं. अजित कडकडे संगीत रजनी मध्ये पंडितजींच्या अवीट गोडीच्या रचना प्रत्यक्ष ऐकण्याची संधी रसिकांना मिळणार असल्याचे आयोजक समीर बापर्डेकर यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे ओघवते आणि अभ्यासपूर्ण निरूपण अनघा मोडक करणार असून, संपूर्ण रजनी भक्तीरस, भावस्पर्शी अभिव्यक्ती आणि सुरेल सादरीकरणाने सजलेली असेल. अशा दुर्मिळ आणि उच्च दर्जाच्या कार्यक्रमांची संधी क्वचितच लाभत असल्याने रसिकांनी या सशुल्क संगीत सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : 9769977380

संबंधित पोस्ट

गायिका सुलोचना चव्हाण यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची स्वरांजली विलेपार्ले येथे ‘सोळावं वरीस धोक्याचं’ कार्यक्रम

भारतीय टपाल विभागाच्यावतीने ‘शोले’ या गाजलेल्या चित्रपटाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विशेष सन्मान

बॉलीवूड अभिनेता रणदीप हुड्डा जाट च्या यशानंतर आता नव्या चित्रपट ‘ऑपरेशन खुकरी’ या चित्रपटात मोठी भूमिका करणार चित्रपटाचे हक्क घेतले विकत ….

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणी  झालेआई-बाबा…

एशियन कल्चर’ पुरस्काराने दिग्दर्शिका सई परांजपे सन्मानित*आपली संस्कृती या महोत्सवांदरम्यान पहायला मिळते : दिग्दर्शिका सई परांजपे*

vishwatmaklokswamivarta

नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडियाच्यावतीने नामवंत सिनेमॅटोग्राफर नवरोझ कॉन्ट्रॅक्टर यांना विशेष कार्यक्रमाव्दारे वाहणार आदराजंली