vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन देयकांसाठी आता नवीन सेवार्थ प्रणाली;जिल्ह्यातील आहरण व संवितरण अधिकारी यांना प्रशिक्षण· पेपरलेस पद्धतीने सादर होणार वेतन देयके

शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन देयकांसाठी आता नवीन सेवार्थ प्रणाली;जिल्ह्यातील आहरण व संवितरण अधिकारी यांना प्रशिक्षण· पेपरलेस पद्धतीने सादर होणार वेतन देयके

लातूर, प्रतिनिधी: जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालये, आस्थापनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची वेतन देयकासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी नवीन सेवार्थ प्रणाली विकसित करण्यात आली आहे. यामध्ये पेपरलेस पद्धतीने केवळ ऑनलाईन वेतन देयके दाखल करावी लागणार असून वेतन देयक प्रक्रिया अधिक सुलभ, जलद व पारदर्शक होणार आहे. या प्रणालीच्या वापराबाबत माहिती देण्यासाठी लातूर जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत १० मार्च २०२६ रोजी दोन सत्रात जिल्ह्यातील सर्व आहारण व संवितरण अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते

जुने जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित या प्रशिक्षणाला लातूर जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयातर्फे अधिनस्त असलेल्या आहरण व संवितरण अधिकारी, लेखा विषयक काम पाहणारे कर्मचारी यांना जुन्या सेवार्थ प्रणालीतून नवीन सेवार्थ प्रणालीत डाटा ट्रान्स्फर करण्यापूर्वी माहिती अद्ययावत करणे, पदांची पडताळणी, नवीन सेवार्थ प्रणालीमधील माहितीची पडताळणी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी सकाळच्या सत्रात झालेल्या प्रशिक्षणाला अहमदपूरच्या उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे यांची प्रमुख उपस्थिती होती. दुपारच्या सत्रात जिल्हास्तरीय अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले. जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. उज्वला पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अपर कोषागार अधिकारी मा. रो. गुटे, ख. नै. खोजे, ना. ए. बुध्दिवंत यांच्यासह जिल्ह्यातील आहरण व संवितरण अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.

मास्टर ट्रेनर्स यांनी केले मार्गदर्शन,नवीन सेवार्थ प्रणालीमुळे वेतन देयकाची मुद्रित प्रत कोषागारात सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही. वेतन देयके ई-स्वरुपात पाठविण्यात येणार असून सदर देयके आधार बेस ओटीपीद्वारे ई-हस्ताक्षर करुन करण्यात येणार आहेत. यामुळे वेतन देयक प्रक्रिया अधिक सुलभ, जलद व पारदर्शक होणार आहे. नवीन सेवार्थ प्रणालीसंदर्भातील सविस्तर प्रशिक्षण मास्टर ट्रेनर्स उपकोषागर अधिकारी (सं) आर. डी. माने, तांत्रिक सहाय्यक शिवलिंग उटगे यांनी दिले. यावेळी पीपीटीद्वारे नवीन सेवार्थ प्रणाली वापराचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. जिल्ह्यातील आहरण व संवितरण अधिकारी, कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

****

संबंधित पोस्ट

चिखली तहसील कार्यालयामार्फत ‘समाधान शिबिराचे’ आयोजन; नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक -सारसबागेची ‘शाहीनबाग’ होऊ देणार नाही; पुण्यात हिंदुत्वनिष्ठ संघटना आक्रमक! बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सारसबागेत प्रतिबंधात्मक आदेश काढा; प्रशासकीय अपयशाचा आंदोलकांकडून निषेध*

पहलगाम, जम्मू & काश्मीर येथे पर्यटकावर दहशतवादी हल्याची माहिती महाराष्ट्रातील पर्यटक असण्याची शक्यता रायगड जिल्ह्यातील कोणी व्यक्ती असल्यास  त्यांच्या मदतीकरिता संपर्क

बेळगावी येथे 19 ऑक्टोबरला माजी सैनिक मेळावा

vishwatmaklokswamivarta

बालसाहित्यिकांची कार्यशाळा व ग्रंथप्रदर्शन वाचन हे एकमेव व्यसन ज्यामुळे माणूस वाचतो- ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड

vishwatmaklokswamivarta

मुंबई-गोवा महामार्गावरील प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करावीत –जिल्हाधिकारी किशन जावळे