vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

जागेवरच निवड संधी’ या मोहिमेअंतर्गत रोजगाराची संधी;लातूर येथे 13 मार्च रोजी प्लेसमेंट ड्राईव्ह

‘जागेवरच निवड संधी’ या मोहिमेअंतर्गत रोजगाराची संधी;लातूर येथे 13 मार्च रोजी प्लेसमेंट ड्राईव्ह

 लातूर, प्रतिनिधी : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंडीत दीनदयाल उपाध्याय जागेवरच निवड संधी (प्लेसमेंट ड्राईव्ह)चे शुक्रवार, 13 मार्च, 2026 रोजी सकाळी 11 वाजता लातूर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे आयोजित करण्यात आले आहे

या रोजगार मेळाव्यात नामांकित आस्थापना, उद्योजक सहभागी होणार आहेत. या आस्थापनेमध्ये दहावी, बारावी, कोणतीही पदवी, पदव्युत्तर पदवी, आय.टी.आय., डिप्लोमा, तसेच इतर शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांना सहभागी होता येणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी शुक्रवार, 13 मार्च, 2026 रोजी सकाळी 11 वाजता लातूर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तंत्र प्रशाला केंद्र, जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालया समोर, लातूर येथे स्वखर्चाने मुलाखती करीता आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे, स्वत:चा रिझ्युम, बायोडाटा, पासपोर्ट फोटो इ. (तीन प्रती) सह उपस्थित रहावे, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, लातूर यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

श्रावण महिना आणि आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वेरुळ  भाविकांना उत्तम सुविधा देण्यास कटीबद्ध – जिल्हाधिकारी दिलीप स्वामीश्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर घृष्णेश्वर मंदिर परिसरात सुविधांचा आढावा..

झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी जलद पुनर्विकास गरजेचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस क्रेडाई-एमसीएचआय आयोजित ‘चेंज ऑफ गार्ड’ सोहळा

विकास लवांडे यांना तात्काळ अटक करा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी**वारकरी संप्रदायातील लोकांना ‘घुसखोर’ ठरवण्याचा अधिकार विकास लवांडे आणि राष्ट्रवादीला कुणी दिला ?* – हिंदु जनजागृती समिती

कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचे शेतकऱ्यांच्या हस्ते उद्घाटन**पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद*

पेण भूगर्भातून आवाज येवून जमिन हादरल्याच्या घटनेचेभूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग पुणे यांच्या मार्फत सर्वेक्षण..

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून गडचिरोली जिल्ह्यातील शाळांमध्ये साकारणार भिंतीवरील पुस्तकालय