vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

कोरोना प्रतिबंधक नियमांमुळे कडक पोलीस सुरक्षेमुळे लालबागचा राजा मंडळ आणि मुंबई पोलिसांमधला तिढा अखेर सुटला.

 कोरोना प्रतिबंधक नियमांमुळे कडक पोलीस सुरक्षेमुळे लालबागचा राजा मंडळ आणि मुंबई पोलिसांमधला तिढा अखेर सुटला आहे.

कोरोना प्रतिबंधक नियमांमुळे कडक पोलीस सुरक्षेमुळे लालबागचा राजा मंडळ आणि मुंबई पोलिसांमधला तिढा अखेर सुटला आहे. मुंबई पोलीस कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहपोलीस उपायुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक करुन निर्बंधांवरुन असलेल्या नाराजीवर सुवर्णमध्य काढला आहे. त्यामुळे ‘लालबागच्या राजा’च्या प्राणप्रतिष्ठेस आता १५ मिनिटांत सुरुवात होणार असल्याची माहिती मंडळाचे पदाधिकारी सुधीर साळवी यांनी दिली

मुंबईसह संपूर्ण राज्यात आज लाडक्या बाप्पाचं आगमन होत आहे. यंदाही कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करुन गणेशोत्सव साजरा केला जात आहे. पण कोरोना प्रतिबंधक नियमांमुळे लालबाग परिसरात मोठा फटका स्थानिकांना बसत असल्याचं दिसून आलं. ‘लालबागचा राजा’च्या श्रींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होऊ शकते त्यामुळे पोलिसांनी परिसरातील दुकानं बंद ठेवली होती. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. याशिवाय परिसरातील अनेक रस्त्यांवर पोलीस बंदोबस्त असल्यानं स्थानिकांना आपल्या घरी जाण्यासही मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत असल्यानं वाद निर्माण झाला होता. स्थानिकांच्या मागण्यांवर लालबागचा राजा मंडळ देखील ठाम होतं आणि राजाच्या प्राणप्रतिष्ठेस विलंब होत होता.

विश्वास नांगरे पाटलांनी काढला सुवर्णमध्य!लालबागचा राजाच्या प्राणप्रतिष्ठेस निर्बंधांमुळे विलंब होत असल्याची माहिती मिळताच मुंबई पोलीस उपायुक्त विश्वास नांगरे थेट मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चेसाठी पोहोचले. मंडळाच्या मागण्या ऐकून घेतल्यानंतर नांगरे पाटील यांनी स्थानिक दुकानदारांसाठी तात्काळ एक नियम जाहीर केला.

“लालबागचा राजाचं दर्शन घेण्यासाठी देशाविदेशातून भक्त इथं येत असतात. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण शहरात कलम १४४ लागू केलं आहे. त्यात इथली जवळपास १०० दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. कारण दुकानं सुरू ठेवली की गिऱ्हाईक इथं जमणार आणि ते दर्शनासाठी गर्दी करणार. त्यामुळे दुकानं बंद ठेवली होती. पण मंडळाचे पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली असून आता येथील १०० दुकानांच्या मालकांना प्रत्येकी दोन पास देण्यात येणार आहेत. यात दुकानाचा मालक आणि एक कर्मचारी अशा फक्त दोघांनाच दुकानात उपस्थित राहता येणार आहे. नियमांचं उल्लंघन होत असल्याचं दिसून आलं तर पुन्हा पूर्वीप्रमाणेच दुकानं बंद केली जातील”, असं विश्वास नांगरे पाटील यांनी म्हटलं आहे.

 

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)ही-मॅन’ची एक्झिट चटका लावणारी, चित्रपट सृष्टीचा सुवर्णकाळ गाजवणारा तारा निखळला- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

सामाजिक न्याय दिनाच्या पूर्वसंध्येला नवी मुंबई महानगरपालिका भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि मुंबई विद्यापीठ यांच्यामध्ये स्मारकात पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याचा सामंजस्य करार*

राज्याच्या किनारपट्टीवरील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये ३ ते ८ ऑगस्टदरम्यान समुद्राला उधाण येणार असून नागरिक, मच्छिमार व पर्यटकांनी सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेण्याचे आवाहन 

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका घेऊन येत आहे,  “इकोफ्रेंडली प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव स्पर्धा २०२४”

vishwatmaklokswamivarta

शंखनाद महोत्सव : ‘सनातन राष्ट्राची सुरक्षा’ उद्बोधन सत्र !**राष्ट्राचे रक्षण शस्त्रानेच करावे लागते!* – मेजर गौरव आर्य, चाणक्य फोरम्

विकसित भारत संकल्प यात्रे’चा शुभारंभ,बृहन्मुंबईतील वाहनांचा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शुभारंभ.

vishwatmaklokswamivarta