
शिवसेना आणि राष्ट्रवादी नेत्यांना टार्गेट करणाऱ्या ईडी कार्यालयाबाहेर संविधान आर्मी मोर्चा काढणार..
मुंबई प्रतिनिधी केंद्रीय संस्थांचा गैरवापर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांना वेडी मार्फत टार्गेट केले जात असून या विरोधात ईडी कार्यालयावर सविधान आर्मी मोर्चा काढणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष जगन भाऊ सोनवणे यांनी दिली. भुसावळ येथे खानदेश तर्फे सहा तारखेला भुसावळ तहसील कार्यालयावर संविधान आर्मीच्या वतीने महामोर्चा काढण्यात आला होता दरम्यान प्रताप सरनाईक अनिल देशमुख एकनाथ खडसे अनिल परब भावना कोळी या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजप सरकार ईडी सारख्या यंत्रणेचा गैरवापर करीत त्यांच्यावर कारवाई करीत आहे. असे वागणे खुनशी आहे भाजपमध्ये देखील अनेक भ्रष्टाचारी नेते आहेत त्यांच्यावर ईडी का कारवाई करीत नाही. याचाच निषेध करण्यासाठी 13 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता ई डी कार्यालयाबाहेर आक्रोश अर्धनग्न तिरंगा महामोर्चा काढण्यात येणार आहे.



