vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

तुम्ही काळजी करू नका, चिपळूण पुन्हा नव्याने उभे करू,’ असा शब्द मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला होता.चिपळूण पूरग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत; मुख्यमंत्र्यांचे शब्द हवेत.

तुम्ही काळजी करू नका, चिपळूण पुन्हा नव्याने उभे करू,’ असा शब्द मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला होता.चिपळूण पूरग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत; मुख्यमंत्र्यांचे शब्द हवेत.

चिपळूण प्रतिनिधी  : येथील महापूर ओसरल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींनी पूरग्रस्तांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. ‘तुम्ही काळजी करू नका, चिपळूण पुन्हा नव्याने उभे करू,’ असा शब्द मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला होता. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता ते शब्द हवेत विरल्याचे दिसून येत आहे. महापुराला दीड महिना लोटला तरीही पूरग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

महापुरामध्ये चिपळूण शहरासह खेर्डी कळंबस्ते परिसरात सुमारे १० ते १२ फूट पाणी आल्याने अनेक घरांत, दुकानात पाणी शिरले, तसेच खेर्डी औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमध्येही मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते. यामुळे प्रापंचिक साहित्य, दुकानातील माल तसेच कारखान्यांमधील उत्पादनांचे मोठे नुकसान झाले. दोनच दिवसांपूर्वी चिपळूण व्यापारी महासंघटनेने येथील तहसीलदारांना शासकीय मदतीसंदर्भात निवेदन दिले असून, मदत न मिळाल्यास आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला आहे. या इशाऱ्याकडे शासन किती गांभीर्याने पाहते, हे लवकरच समजून येईल. मात्र, तोपर्यंत काय करायचे, असा प्रश्न व्यापाऱ्यांना पडला आहे. काही मोजक्या व्यापाऱ्यांनी आपल्या हिमतीवर व्यवसाय सुरू केले आहेत. उर्वरित पूरग्रस्त व्यापारी आपला पुन्हा व्यवसाय उभा करण्यासाठी चाचपडत आहेत. याकडे शासनाला लक्ष देण्यास वेळ नाही.

या आहेत अडचणी- इन्शुरन्स कंपन्यांच्या जाचक अटींमुळे क्लेम मंजुरीत अडचणी- व्यापारी, उद्योजक व वाहनधारक जाचक अटींमुळे कचाट्यात- बँकांचीही वेळ काढूपणाची भूमिका खेर्डी औद्योगिक वसाहतीत कारखानदारांचे मोठे नुकसान झाले आहे. व्यवसायिकांचेदेखील मोठे नुकसान झाले असून, या सर्वांसमोर पुन्हा व्यावसायिकदृष्ट्या उभे कसे राहावे, असा प्रश्न आहे. शासनाचे दुर्लक्ष, इन्शुरन्स कंपन्यांच्या जाचक अटींमुळे आम्ही आर्थिक संकटात आहोत. शासनाने आमच्या प्रश्‍नांकडे लक्ष दिले नाही, तर उपोषण छेडू.- गजानन ऊर्फ दादा कदम, उपाध्यक्ष, नॉर्थ रत्नागिरी इंडस्ट्रीज असोसिएशन

संबंधित पोस्ट

सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीवरील बंद उठवल्यानंतर राज्यात पुन्हा बैलगाडा शर्यातीचा धुरळा उडण्यास सुरूवात.

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या पूर्वतयारीचा अजित पवार यांच्याकडून आढावा..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात गुंतवणूकदारांसाठी सुलभ वातावरण निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्नशील – निवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड

vishwatmaklokswamivarta

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024-जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघात 109 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात ; 119 उमेदवारांनी अर्ज घेतले मागे

vishwatmaklokswamivarta

मुंबईत आयआयटीमध्ये २६ वर्षीय विद्यार्थ्याने हॉस्टेलच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

vishwatmaklokswamivarta

सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आपला निर्णय दिला: सत्तेसाठी हपापलेल्या राजकारण्यांची चिरफाड करणारा निर्णय’ – उद्धव ठाकरे यांनी दिली सत्तासंघर्ष प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया..