vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या प्रयत्नांना यश- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बंद मंदिरांचे दरवाजे उघडले, गावोगावी पुन्हा घुमला घंटानाद!

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या प्रयत्नांना यश- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बंद मंदिरांचे दरवाजे उघडले, गावोगावी पुन्हा घुमला घंटानाद!

 

     सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी- दशकानुदशकांचे अंतर्गत मतभेद, मानकऱ्यांमधील समन्वय आणि मार्गदर्शनाचा अभाव यामुळे कुलूपबंद असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंदिरांमध्ये ‘महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या प्रयत्नांमुळे पुन्हा चैतन्याचा घंटानाद घुमू लागला आहे. महासंघाने राबवलेले नामसत्संग, माणगाव येथील जिल्हास्तरीय मंदिर परिषद आणि प्रत्यक्ष संवाद या त्रिसूत्रीमुळे घारपीचे बंद मंदिर उघडले, माडखोलमधील विखुरलेले मानकरी एकत्र आले तर पडवे, ओसरगाव आणि उगाडे येथील देवस्थानांनी सुव्यवस्थापन व धर्मरक्षणाची कास धरली आहे. आध्यात्मिक हानी रोखण्यासाठी महासंघाने उभारलेली ही संघटनशक्ती जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे, अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री. संजय जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

  सिंधुदुर्गनगरी या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेत सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सदगुरू सत्यवान कदम, मंदिर महासंघाचे श्री. शरद राऊळ, श्री. यशवंत परब, हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजेंद्र पाटील, मंदिराचे मानकरी श्री लिंग माऊली देवस्थान ओसरगावचे सर्वश्री घनश्याम राणे, श्री देव रवळनाथ मंदिर पडवे ता. मालवणचे गोविंद रामचंद्र परब, श्री माऊली मंदिर, घारपी येथील शिवराम गावडे, दीपक गावडे, विलास गावडे, श्री पावणाई रवळनाथ मंदिर, माडखोलचे दत्ताराम राऊळ, ग्रामपुरोहित जनार्दन भागवत, श्री भावई मंदिर कुणकेरीचे सुनील राऊळ, मंदिर महासंघाचे जीवन केसरकर सुनिल परब, घनश्याम राणे, रामचंद्र चव्हाण हे उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत पुढील माहिती पत्रकारांना देण्यात आली

१. घारपी (ता. सावंतवाडी) – २० वर्षांचा गतिरोध संपला : येथील ग्रामदैवताचे मंदिर दोन दशकांपासून मतभेदांमुळे पूर्णतः बंद होते. महासंघाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन दोन्ही बाजूंच्या मानकऱ्यांशी समन्वय साधला. या यशस्वी चर्चेमुळे प्रदीर्घ काळाने मंदिर पूर्ववत सुरू झाले असून वार्षिक धार्मिक कार्यक्रम आता उत्साहात सुरू झाले आहेत.

२. माडखोल (ता. सावंतवाडी) नामसत्संगातून मानकऱ्यांचे संघटन : श्री पावणाई रवळनाथ मंदिरात मानकऱ्यांमध्ये असलेल्या दुराव्यामुळे व्यवस्थापनात अडथळे येत होते. महासंघाने येथे ‘नामसत्संग’ सुरू केल्याने मानकऱ्यांच्या विचारात बदल झाला. ईश्वरी अधिष्ठानामुळे आता सर्व मानकरी एकत्रितपणे मंदिराचा कारभार पाहत आहेत, ज्याचे संपूर्ण श्रेय ग्रामस्थ ‘नामसत्संगा’ला देत आहेत.

३. पडवे व ओसरगाव (ता. कुडाळ) – परंपरेचे रक्षण श्री देव रवळनाथ मंदिर (पडवे) आणि श्री लिंग माऊली मंदिर (ओसरगाव) ही देवस्थाने पूर्वापार चालत आलेल्या प्रथा-परंपरेप्रमाणे चालवण्यात अडचण येत होती. मात्र माणगाव येथील जिल्हास्तरीय मंदिर परिषदेतून प्रेरणा घेऊन आणि महासंघाने करून दिलेल्या आध्यात्मिक जाणीवेमुळे येथील विश्वस्त आता आपल्या प्रथापरंपरा अबाधित राखण्यासाठी सक्रिय झाले आहेत.

४. उगाडे (ता. दोडामार्ग ) – सुव्यवस्थापन आणि धर्मशिक्षण येथील विश्वस्त मंदिर महासंघाशी जोडले गेल्यावर त्यांनी मंदिराच्या पवित्र्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. मंदिरात ‘वस्त्रसंहिता’ (ड्रेस कोड) लागू करण्यासोबतच धर्मशिक्षणाचे फलक, सामूहिक आरती आणि साधना सत्संग सुरू केले आहेत. यामुळे भाविकांमध्ये सात्त्विक आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

    “मंदिरे ही धर्माची आधारशिला आहेत. सिंधुदुर्गात घडलेला हा बदल केवळ मंदिरांचे दरवाजे उघडणे नसून ती हिंदू समाजाच्या संघटित होण्याचे लक्षण आहे, असे प्रतिपादन मंदिर महासंघाचे श्री. संजय जोशी यांनी केले.श्री. सुनील घनवट,राष्ट्रीय संघटक, मंदिर महासंघ.(संपर्क : ७०२०३८३२६४)

00000

संबंधित पोस्ट

महानगरपालिका निवडणुकांसाठी पुरेशा भरारी पथकांची स्थापना करावी – राज्य निवडणूक आयुक्त

vishwatmaklokswamivarta

दहावीच्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्याकडून शुभेच्छा तणाव न घेता आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवून परीक्षा द्या

vishwatmaklokswamivarta

पक्षकारांच्या न्यायासाठी नवोदित वकिलांनी सतत अध्ययन करावे -न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे जुन्नर येथील जुन्या न्यायालयाच्या इमारतीचा विकास आराखडा तयार करा-उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta

उष्मालाट जनजागृती उपाययोजनेबाबत कार्यशाळा संपन्न…

vishwatmaklokswamivarta

भारतीय राज्यघटनेची उद्देशिका जिल्ह्यातील १० लाख घरांपर्यंत पोहोचवू – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या औचित्याने पालकमंत्र्यांच्या हस्ते “घर घर संविधान” उपक्रमाचा शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

राज्यातील २३ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी आज मतदान

vishwatmaklokswamivarta