vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

लोणी येथे ५ व ६ मे रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

लोणी येथे ५ व ६ मे रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

​अहिल्यानगर, ते प्रतिनिधी-युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अहिल्यानगर आणि लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ५ व ६ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता लोणी येथील पद्मश्री विखे पाटील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी नोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी सहाय्यक आयुक्त योगेश उगले व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांनी केले आहे.

​कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून आणि जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा होत आहे.

​या मेळाव्यात टोयोटा किर्लोस्कर मोटार प्रा. लि. यांच्यामार्फत जिल्ह्यातील १० वी, १२ वी, बी.ए., बी.कॉम. व बी.एस्सी. (आयटीआय, डिप्लोमा व इंजिनिअरिंग वगळून) उत्तीर्ण १८ ते २१ वयोगटातील उमेदवारांना ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत दोन वर्षांचे प्रशिक्षण व एक वर्षाची ॲप्रेंटिसशिप मिळणार आहे.​उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार असून इच्छुकांनी वेळेवर उपस्थित राहावे. सहभागासाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र. ०२४१-२९९५७३५ किंवा मेळावा समन्वयक वसीमखान पठाण (मो. ९४०९५५५४६५) यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

अनुसूचित जाती- जमातीच्या बेरोजगारांसाठी उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

मोफत तांत्रिक उद्योजकता प्रशिक्षणाचे आयोजन

प्रशिक्षणार्थ्यांसाठी भोजन पुरवठादारांकडून निविदा मागविल्या

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

65 वर्षांवरील रिक्षा व मीटर टॅक्सी चालकांना धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळात नोंदणीचे आवाहन