vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

नवीन कामगार संहिता नियमावलीवर हरकती व सूचनानोंदवण्याचे कामगार उप आयुक्तांचे आवाहन

नवीन कामगार संहिता नियमावलीवर हरकती व सूचनानोंदवण्याचे कामगार उप आयुक्तांचे आवाहन

      अमरावती, प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागामार्फत राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी नवीन कामगार संहितांच्या नियमावलीची घोषणा करण्यात आली आहे. याअंतर्गत औद्योगिक संबंध संहिता आणि वेतन संहिता यांबाबतच्या अधिसुचना दि. 28 आणि 30 एप्रिल 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या प्रस्तावित नियमावलीबाबत संबंधित व्यक्ती, कामगार संघटना आणि भागधारकांनी आपल्या हरकती व सूचना विहित मुदतीत नोंदवाव्यात, असे आवाहन अमरावती विभागाचे कामगार उप आयुक्त चं. अं. राऊत यांनी केले आहे.

     औद्योगिक संबंध संहिता आणि वेतन संहिता यांसारख्या महत्त्वाच्या नियमांबाबत हरकती नोंदवण्यासाठी 45 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. ज्या नागरिकांना किंवा संघटनांना या नियमावलीबाबत काही बदल सुचवायचे असतील, त्यांनी आपल्या सूचना लेखी स्वरूपात ‘कामगार आयुक्त कार्यालय, कामगार भवन, बांद्रा-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई – 400 051’ या पत्त्यावर पाठवाव्यात. तसेच, mh.labourcodes@gmail.com या ई-मेल आयडीवर देखील आपल्या सूचना पाठवता येतील. अधिसुचना प्रसिद्ध झाल्यापासून 45 दिवसांच्या आत प्राप्त होणाऱ्या सूचनांचाच विचार केला जाणार असल्याने, सर्वांनी या संधीचा लाभ घेऊन आपले मत नोंदवावे, असे आवाहन कामगार विभागातर्फे करण्यात आले आहे.

 

00000000

संबंधित पोस्ट

रेशिम विभाग आपल्या दारी’ मोहिम

vishwatmaklokswamivarta

दिव्यांग व्यक्तीनी फिरत्या वाहनावरील दुकानासाठी अर्ज करण्याचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत जमीन विक्रेत्यांनी संपर्क साधावा

आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या मदतीतून विजय शिंदेंचा सोललेल्या लसूण विक्रीचा व्यवसाय..

vishwatmaklokswamivarta

वैश्विक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवरही देशाकडे सध्या सुमारे दोन महिन्यांचा इंधनसाठा उपलब्ध-इंडियन बायोगॅस असोसिएशनचे अध्यक्ष गौरव केडिया यांनी सांगितले.

vishwatmaklokswamivarta

भारतीय हवाई दलाने तांत्रिक शाखेत अधिकारी संवर्गात पात्र व्यक्तींचा समावेशासाठी नवी योजना जाहीर