vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

साडेतीन किलोची गाठीसह गर्भपिशवी काढत डॉक्‍टरांनी रुग्‍णाला जीवदान दिले आहे. पत्रकार परिषदेत डॉ. नीलेश पूरकर, डॉ. वैशाली अग्रवाल व डॉ. नीलेश चव्‍हाण यांनी याबाबत माहिती

साडेतीन किलोची गाठीसह गर्भपिशवी काढत डॉक्‍टरांनी रुग्‍णाला जीवदान दिले आहे. पत्रकार परिषदेत डॉ. नीलेश पूरकर, डॉ. वैशाली अग्रवाल व डॉ. नीलेश चव्‍हाण यांनी याबाबत माहिती

नाशिक प्रतिनिधी: नाशिक येथील  ३७ वर्षीय महिलेच्‍या गर्भाशयात तब्‍बल साडेतीन किलोची गाठ आढळली. हालाखीची कौटुंबिक पार्श्वभूमी, शरीरात रक्‍ताची कमतरतेसह अन्‍य आव्‍हानांचा सामना करताना पायोनिअर हॉस्‍पिटलमध्ये महिला रुग्‍णावर यशस्‍वी शस्‍त्रक्रिया केली आहे. साडेतीन किलोची गाठीसह गर्भपिशवी काढत डॉक्‍टरांनी रुग्‍णाला जीवदान दिले आहे. शुक्रवारी (ता.१७) झालेल्‍या पत्रकार परिषदेत डॉ. नीलेश पूरकर, डॉ. वैशाली अग्रवाल व डॉ. नीलेश चव्‍हाण यांनी याबाबत माहिती दिली.

गर्भपिशवी काढत रुग्‍णाला जीवदानडॉ. पूरकर म्‍हणाले, की येवला येथील मुक्ताबाई परळकर यांना वर्षभरापूर्वी ह्रदयाचा वॉलचा त्रास उद्भवला होता. जीवनदायी योजनेत त्‍यांच्‍यावर शस्त्रक्रिया केली होती. काही दिवसांनी वैद्यकीय तपासणीत गर्भाशयात गाठ आढळली. त्यांची परिस्थिती हलाखीची असल्याने खर्च परवडणारा नव्हता. गर्भपिशवीची शस्‍त्रक्रिया करणे अत्‍यंत आवश्‍यक असताना, गुंतागुंत पाहता कोणीही शस्त्रक्रियेसाठी तयार नव्‍हते. त्यामुळे शस्त्रक्रियेला वर्षभर विलंब झाला. दरम्यान, येवल्यात डॉ. राजीव चंडायला यांनी संपर्क साधत महिलेची तब्‍येत ढासळत असल्‍याची माहिती दिल्‍याचे डॉ. पूरकर यांनी सांगितले. डॉ. अग्रवाल म्‍हणाल्‍या, महिलेच्या गर्भ पिशव्याच्या गाठीतून रक्तस्राव सुरू होता. शरीरातील हिमोग्‍लोबीन चारपर्यंत खालावल्‍याने विलंब जिवाला धोका निर्माण करणारा होता. अत्यवस्थ स्थितीत पायोनिअर हॉस्पिटल प्रारंभी रक्त पिशवीतून हिमोग्लोबीनची स्‍तर उंचावला. यानंतर शस्त्रक्रिया करण्यात आली. नुकताच महिला रुग्‍णाला घरी सोडण्यात आल्‍याचे त्‍यांनी नमूद केले

संबंधित पोस्ट

चीन पुरस्कृत हॅकर्सकडून लद्दाख परिसरातील वीज केंद्रे लक्ष्य- रिपोर्ट

निराधार, श्रावणबाळचे पैसे तात्काळ वितरीत करावेत-उपमुख्यमंत्री अजित पवार

वाई नगरपरिषदेतील कर्मचारी बदलीबाबत शासनाच्या नियमानुसार कार्यवाही करणार- मंत्री उदय सामंत

नमुंमपा निवडणूक 2025-2026 करिता मतदान अधिका-यांच्या प्रशिक्षणास नेरुळ विभागापासून प्रारंभ-प्रशिक्षणास गैरहजर कर्मचा-यांवर कायदेशीर कारवाई

राज्यात आजपर्यंत 1 कोटी 63 लाख 60 हजार पीकविमा अर्ज दाखल,लाखो शेतकऱ्यांनी भरला एक रुपयात पीकविमा,आज विमा भरण्याचा अखेरचा दिवस – कृषी मंत्री धनंजय मुंडे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वात उंच पुतळ्याचं आज औरंगाबादेत अनावरण

vishwatmaklokswamivarta