vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

विशेष सखोल पुनरिक्षण; मतदार मॅपिंगचे काम दि.१० पर्यंत पुर्ण करण्याचे निर्देश

विशेष सखोल पुनरिक्षण; मतदार मॅपिंगचे काम दि.१० पर्यंत पुर्ण करण्याचे निर्देश

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात मतदार मॅपिंगच्या कामाला वेग आला आहे. येत्या दि.१० मे पर्यंत जिल्ह्यातील मॅपिंगचे काम पूर्ण करावे असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले आहेत.

दरम्यान जिल्ह्यातील मॅपिंगच्या कामाला वेग आला असून बुधवार दि. ६ पर्यंत जिल्ह्यातील एकूण ३२,४४,२५८ मतदारांपैकी २४,१५,०३५ मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असून एकूण प्रगती ७४.४४ टक्क्यांवर पोहोचली आहे,अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी सरिता चौधरी यांनी दिली आहे.

 जिल्हाधिकारी विनय गोडा यांनी संबंधित सर्व मतदार नोंदणी अधिकारी, विधानसभा मतदार नोंदणी अधिकारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) आणि सुपरवायझर यांना हे काम निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 दरम्यान, मॅपिंगदरम्यान काही मतदार त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर आढळून न आल्याचे तसेच काही मतदार मृत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा प्रकरणांमध्ये निवडणूक आयोगाच्या नियमानुसार संबंधित मतदारांना ‘स्थलांतरित मतदार’ व ‘मृत मतदार’ या वर्गवारीत समाविष्ट करून नावे वगळण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

 SIR अंतर्गत मतदार मॅपिंग ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून त्यामुळे मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत व पारदर्शक होण्यास मदत होते. यामुळे पुनरावृत्ती टाळली जाते तसेच स्थलांतरित, मृत किंवा अनुपलब्ध मतदारांची नोंद व्यवस्थित ठेवता येते. परिणामी निवडणूक प्रक्रिया अधिक विश्वासार्ह व निष्पक्ष बनते.

 या प्रक्रियेसाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) घरी भेट देत असताना आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे, तसेच जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध BLO माहितीच्या आधारे संपर्क साधून स्वतःचा तपशील अद्ययावत करून मॅपिंग प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक संपन्न

लातूर जिल्ह्यात लंपी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण, जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपायांवर भर

गणेशोत्सव नियोजन व सार्वत्रिक निवडणूक विषयक कामकाजाचा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी घेतला आढावा

विधानसभा प्रश्नोत्तर :शासकीय रुग्णालयांमध्ये सिटीस्कॅन आणि एमआरआय-मशीन खरेदीसाठी निधी उपलब्ध करून देणार- उपमुख्यमंत्री अजित पवार वैद्यकीय शिक्षण विभागाकडील खरेदी शासन नियमानुसारच – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

vishwatmaklokswamivarta

सातारा जिल्ह्यातील ‘साखरवाडी’ आणि पुणे जिल्ह्यातील ‘कुंजीरवाडी’ गावांना जैवविविधता संवर्धनासाठी केंद्र सरकारकडून निधी

vishwatmaklokswamivarta

झवेरी बाजार परिसराचा कायापालट करण्यास शासन सहकार्य करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपहिल्या ‘झवेरी बाजार जेम्स अँड ज्वेलरी फेस्टिवल 2025’ चे उद्घाटन