vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

अँटी नार्कोटिक्स सेलच्या- पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त

अँटी नार्कोटिक्स सेलच्या- पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त

गुन्हे प्रतिनिधी-अँटी नार्कोटिक्स सेलच्या (ANC) कांदिवली युनिटने अंधेरी (Mumbai) पश्चिमेतील वर्सोवा परिसरातील यारी रोडजवळ छापा टाकत मोठी ड्रग्ज (Drugs) कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी (Police) दोन आरोपींकडून 765 ग्रॅम हेरॉईन जप्त केले असून, आंतरराष्ट्रीय बाजारात या अमली पदार्थाची किंमत सुमारे 3.82 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड परिसरात व्यावसायिक स्वरुपात एमडी ड्रग्सची खरेदी-विक्री करणाऱ्या मोठ्या अंमली पदार्थ रॅकेटचा (Racket) गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-4 ने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल 13 कोटी 61 लाख 38 हजार 480 रुपये किंमतीचा एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले. याप्रकरणात 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

कांदिवली ड्रग्स प्रकरणातपोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या प्रकरणात ड्रग्ज पुरवठा साखळीशी संबंधित इतर व्यक्तींचाही शोध घेतला जात आहे.

मिरा रोड प्रकरणी 10 आरोपींना अटक,मिरा रोड प्रकरणात पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 एप्रिल 2026 रोजी मिरा रोड पूर्व येथील छेडा आदर्श बिल्डिंग परिसरातील एका घरावर छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान श्रीमती फिरदोस अरबाज कुरेशी यांच्या घरातून 1 किलो 324 ग्रॅम वजनाचा अंदाजे 2 कोटी 66 लाख 17 हजार 280 रुपये किंमतीचा एमडी ड्रग्स जप्त करण्यात आला. तपासात हा अंमली पदार्थ तिचा पती अरबाज वकील कुरेशी याचा असल्याचे निष्पन्न झाले.

याप्रकरणी नयानगर पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधीद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 अंतर्गत कलम 8(क), 21 (क), 22(क) आणि 29 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-4 ने तपासाची सूत्रे हाती घेत मुंबई, मिरा रोड आणि गुजरात येथे धडक कारवाया करत एकामागोमाग एक अशा 10 आरोपींना अटक केली. आरोपींकडून एकूण 6 किलो 773 ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग्स जप्त करण्यात आला असून त्याची बाजारातील किंमत 13 कोटींहून अधिक असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच बरोबर एम.डी. ड्रग्ज तयार करण्यासाठी लागणारी 255 लिटर ची रसायने ही हस्तगत करण्यात आली आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अरबाज कुरेशी, मोईज खान, अरमान राईन, सुनिल यादव, मोहम्मद वसिम शेख, इरफान कुडीया, मोहम्मद अराफत अन्सारी, खालदा अन्सारी आणि आकाश यादव यांचा समावेश आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपआयुक्त संदीप डोईफोडे आणि सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-४ चे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख आणि त्यांच्या पथकाने ही धडाकेबाज कारवाई यशस्वी केली.

संबंधित पोस्ट

लाचेच्या तक्रारीसाठी कायमस्वरूपी मोबाईल क्रमांक जारी..

आलापल्ली वनपरिक्षेत्रात वनविभागाच्या धडक कारवाईत १२ शिकारी ताब्यात वन्यजीव अवयवांसह साहित्य जप्त; कायदेशीर कारवाई सुरू

बीडमधील हत्येप्रकरणी बातमी; दोन मुख्य आरोपींना अटक, संतोष देशमुखांचं लोकेशन देणाराही ताब्यात..

नयनरम्य परिसर  लोणावळा व्हिला बुकिंग प्रकरणात ऑनलाइन फसवणूक उघड; आरोपीला अटक

vishwatmaklokswamivarta

अंधेरी पोलिसांचे मोठे यश – वृद्धांना फसवणारा दुष्ट आरोपी नाशिक येथून अटक, ६ प्रकरणे उलगडली

राज्य उत्पादन शुल्क कार्यालयामार्फत छाप्यातून १३ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त २ ते ८ ऑक्टोबर दरम्यान महात्मा गांधी सप्ताहात झाली कारवाई

vishwatmaklokswamivarta